Headlines

हिजाबबाबत नसिरुद्दीन शाह यांचं ‘ते’ वक्तव्य आताच का होतंय व्हायरल?

[ad_1]

Hijab Controversy In Karnataka : सध्या देशात कर्नाटकातील हिजाब वाद चिघळताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमधून पुन्हा एकदा हिजाब वादाला हवा मिळाली आणि यातून धार्मिक तेढ निर्माण करणारं वातावरण आणखी बळावलं. 

समाजातील अनेक स्तरांतून या मुद्द्यावर प्रतिक्रिया देण्यात आल्या. थेट न्यायालयातही हा वाद पोहोचला. 

एकिकडे हा मुद्दा वातावरण आणखी तणावपूर्ण करत असतानाच आता यामध्ये ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शन नसिरुद्दीन शाह यांच्या एका मुलाखतीतील हिजाबविषयीचं वक्तव्य लक्ष वेधत आहे. 

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतरच्या काळात शाह यांनी ही मुलाखत ‘द वायर’ला दिली होती. जिथं त्यांनी इस्लाम धर्मातील काही समजुतींबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. 

आता शाह यांचं हेच वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. 

काय म्हणाले होते शाह ? 
जर हिंदू माथ्यावर टिळा लावून इसाई त्यांच्या गळ्यात धर्माचं प्रतिक घालू शकतात, तर मुस्लिमांच्या धार्मिक भावना प्रदर्शित करण्यावर विरोध का?  माझी हरकत फक्त हिजाबला आहे. कारण, माझ्या मते बुरख्याचा कुरआन-ए-शरीफमध्ये उल्लेखच नाही, असं नसिरुद्दीन शाह म्हणाले होते. 

‘हिजाबचा उल्लेख असला तरीही इथे संदर्भ हा ‘मजहब’, धर्माच्या हिजाबाशी अर्थात नजरेत असणाऱ्या एका अदृश्य पडद्याशी आहे. माझा असा विचार आहे की आपलं मन हे कायम अनावश्यक गोष्टींमागे धावतं.

अनेकदा पोषाख आणि दिसण्याबाबत हे जास्त घडतं. नेहमी हे पाहिलं गेलंय. ही नवी बाब नाही की धर्माच्या ठेकेदारांनी धर्मग्रंथांमध्ये लिलिलेल्या संदर्भांना स्वत:च्या फायद्यासाठी स्वत:च्याच सोयीनुसारच सादर केलं आहे’, असं म्हणत त्यांनी आपले विचार स्पष्ट केले होते.  

एका खेळणाऱ्या चिमुकल्या मुलीनं लहान झब्बा घातला आणि तिचे पाय दिसत आहेत, तर माझं मत असं आहे ती तुम्ही तिचे पाय का बघता? इथे नजरेचा पडदा अर्थात नजर स्वच्छ असणं महत्त्वाचं आहे. नजरेचा हिजाब महत्त्वाचा आहे, असा आग्रही सूर त्य़ांनी आळवला होता. 

नको त्या मुद्द्यांवर लक्ष देण्यापेक्षा मुलांच्या शिक्षणांकडे लक्ष द्या, असंही ते इस्लाम धर्मियांना उद्देशून म्हणाले. मदरस्यांव्यतिरिक्तही मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी त्यांनी आर्जव केली. 

पोलीस, संरक्षण यंत्रणांमध्ये मुस्लिमांची संख्या का कमी आहे, याकडे लक्ष द्या. माझ्यासाठी हेच सर्व इस्लाम आहे, असं म्हणत त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे त्या मुलाखतीमध्ये अधोरेखित केले होते. 

‘माझ्या मते जगात असा दुसरा देश नसेल जिथं कुरआन-ए-शरीफ इतकं वाचलं जातं पण त्यातून शिकवण फार कमी घेतली जाते’, असं म्हणत त्यांनी आपला मुद्दा ठामपणे मांडला. 

एकिकडे धर्माच्या मुद्द्यावरून समाजात प्रचंड तणाव निर्माण झालेला असताना खरंच अज्ञानाअभावी सुरु असणाऱ्या या वादात उडी घेणं कितपत योग्य आहे याचं आत्मपरीक्षण करण्याची अनेकांनाच गरज आहे. 

इतक्यावरच न थांबता एक व्यक्ती म्हणून स्वत:ची प्रगती करण्यासाठीचे मुद्दे कसे प्रकाशात आणले जातील यावरही भर देत हा तिढा सोडवला पाहिजे असाच सूर शाह यांनी आळवला होता. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *