हिचं ठरलंय….! Rashmika Mandanna लग्न कधी करणार, स्वत:च दिलं उत्तर


मुंबई : (Actress Rashmika Mandanna) अभिनेत्री रश्मिका मंदाना हिनं दाक्षिणात्य कला जगताच्या माध्यमातून संपूर्ण जगभरातील चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. अल्लू अर्जुन याची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या  ‘Pushpa The Rise’  ‘पुष्पा’ या चित्रपटातून तिनं साकारलेली श्रीवल्ली प्रत्येकाच्याच काळजाचा ठाव घेऊन गेली. 

इथे चित्रपट गाजला आणि तिथे त्यातील प्रत्येक कलाकाराची लोकप्रियताही वाढत गेली. काहींच्या खासगी आयुष्याबद्दल चाहत्यांकडून कुतूहल व्यक्त करण्यात आलं. 

अशाच कलाकारांमधलं एक नाव म्हणजे अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचं. रश्मिकाला चाहत्यांनी ‘नॅशनल क्रश’ ही नवी ओळख केव्हाचीच बहाल केली आहे. 

जिच्यावर सारा देश भाळला आहे, त्या रश्मिकाच्या मनात कोण आहे, तिचं लग्न कधी होणार हे सारे प्रश्न चात्यांना पडले आणि रश्मिकापुढे हे प्रश्न काही प्रसंगी मांडलेही गेले. 

25 वर्षीय रश्मिका काही वर्षांपूर्वी कन्नड अभिनेता रक्षित शेट्टी याच्याशी साखरपुडा करुन मोकळी झाली होती. पण, हे नातं पुढे सरकलं नाही. 

आता रश्मिका सुपरस्टार विजय देवेरकोंडा याला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. पण, ती मात्र या नात्याला आणि विजयला खास मित्र असंच संबोधताना दिसते. 

एका मुलाखतीत रश्मिकानं प्रेम, लग्न अशा मुद्द्यांवर तिचं मत मांडलं. आता, प्रेमाबद्दल रश्मिका काही म्हणालीये म्हटल्यावर त्याच्या चर्चा तर होणारच नाही का… 

काय म्हणाली रश्मिका ? 
‘प्रेम म्हणजे जिथे तुम्हाला एकमेकांचा आदर, वेळ आणि एकमेकांपासूनची सुरक्षितता मिळते. प्रेमाला शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. कारण हा सारा भावभावनांचा खेळ आहे. प्रेम हे दोन्ही व्यक्तींकडून व्यक्त होणाऱ्या भावनांतून फुलतं. कोणा एकामुळे ते बहरत नाही’. 

लग्नासाठी आपण तयार आहोत की नाही, हेसुद्धा तिनं स्पष्ट केलं. मला त्याबद्दल काय विचार करावा हेच कळत नाही, कारण यासाठी माझं वय सध्या फार कमी आहे, असं रश्मिका म्हणाली. 

अद्यापही आपण लग्नाचा कोणताही विचार केलेला नाही. पण, माझ्या मते लग्न अशाच व्यक्तीशी करावं ज्याच्यासोबत वावरताना तुम्ही स्वच्छंदी, दिलखुलास असता, असा सुंदर विचार तिने सर्वांसमोर ठेवला. 

दरम्यान, दक्षिणेकडची चित्रपटसृष्टी गाजवणारी रश्मिका आता बॉलिवूड पदार्पणासाठीही सज्ज झाली आहे. 

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याच्यासोबत ती ‘मिशन मंजू’ या चित्रपटात झळकणार आहे. Source link

Leave a Reply