अरे व्हा! आलिया- रणबीरच्या लग्नाची तयारी शेवटच्या टप्प्यात, हा Photo पाहिलाच नसेल


मुंबई : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाच्या तयारीला आता चांगलाच वेग आला आहे. नाही म्हणता म्हणता ही जोडी लग्नमंडपात जाण्यासाठी सज्जही झाली, हे पाहूनच चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. अद्यापही कपूर किंवा भट्ट कुटुंबातील कोणत्याच व्यक्तीनं आलिया आणि रणबीरच्या लग्नाबाबत कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. पण, आता डोळ्यांना दिसणारी दृश्य मात्र या लग्नाच्या तयारीनं जोर धरल्याचं स्पष्ट सांगताना दिसत आहेत. (ranbir kapoor Alia bhatt wedding)

सूत्रांच्या माहितीनुसार मुंबईतच आलिया आणि रणबीर विवाहबंधनात अडकणार आहेत. ज्यासाठी आर.के.स्टुडिओला सुरेख अशी रोषणाई करण्यात आली आहे. जणूकाही एखादी नववधू नटून बसली आहे, असंच ही रोषणाई आणि सजावट पाहताना लक्षात येत आहे. (RK Studio chembur Mumnbai)

सोशल मीडियावर यासंबंधीचा पहिलावहिला व्हिडीओ समोर आला आहे. एखाद्या लग्नघरी जे वातावरण पाहायला मिळतं, तेच हा व्हिडीओ पाहताना लक्षात येत आहे.

आलिया आणि रणबीरच्या लग्नामध्ये सजावटीसोबत सुरक्षेचीही विशेष जबाबदारी घेण्यात आली आहे. महेश भट्ट यांचा मुलगा, राहुल भट्टनंच माध्यमांशी संवाद साधताना याबाबतची माहिती दिली. 

मुंबईतील सर्वोत्तम सिक्युरिटी एजन्सी 9/11 कडे या लग्नाच्या सुरक्षिततेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जवळपास 200 हून अधिकजणांची टीम इथं सुरक्षा व्यवस्था पाहील असं सांगण्यात आलं आहे. 

RK Studio आणि वास्तू या दोन्ही ठिकाणी मोठा पहारा असणार आहे, यादरम्यान ड्रोनचाही वापर होणार असल्याची माहिती राहुलनं दिली आहे. थोडक्यात काय, तर कुठेच सुव्यवस्था डगमगू नये हेच या मंडळींचं लक्ष्य असणार आहे. Source link

Leave a Reply