“हे शिंदे नव्हे तर मिंधे सेनेतील लोक,” ‘कफल्लक’ म्हणत सुषमा अंधारेंचा रामदास कदमांवर हल्लाबोल | sushma andhare criticizes ramdas kadam over comment on uddhav thackeray and meenatai thackerayएकनाथ शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा संशय आहे का? असे म्हणत टीका केल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे समर्थक रामदास कदम यांच्यावर तुटून पडले आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रामदास कदमांनी राज्यात कुठेही फारावे. शिवसेना त्यांना उत्तर देईल, असा थेट इशारा दिला आहे. रामदास कदम यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या. त्या ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होत्या.

हेही वाचा >>> राजकीय आंदोलनातील खटल्यांमधून खासदार – आमदारांची सुटका नाही ; इतर आंदोलकांवरील खटले मागे घेणार

रामदार कदम यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. त्यांचे मानसिक संतूलन ढासाळले असून त्यांनी धसका घेतला आहे. जे दुसऱ्यांना शिल्लक सेना म्हणतात ते मुळात कफल्लक लोक आहेत. त्यांच्याकडे इमानदारी शिल्लक नाही. ते मिंधे आहेत. हे शिंदे सेनेतील नव्हे तर मिंधे सेनेतील लोक आहेत, असा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी केला.

हेही वाचा >>> “काँग्रेस, शिवसेनेसोबत युती करण्यास…”, प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली इच्छा; म्हणाले…

मातोश्रीने रामदास कदम आणि गद्दारांना अत्यंत प्रेमाणे सांभाळले. त्यांना मातोश्रीने कधीही उपाशीपोटी बाहेर पडू दिले नाही. मिनाताई ठाकरे यांनी काळजीने त्यांची सरबराई केली. त्यांच्याच चारित्र्यावर आता हे शिंतोडे उडवत आहेत. रामदास कदमांनी राज्यात कुठेही फिरावे. शिवसेना त्यांना उत्तर देईल,’ असा इशाराही त्यांनी रामदास कदमांना दिला.

हेही वाचा >>> “…तर आम्हीपण तुमच्या गटात येतो” ठाकरे गटातील आमदारांच्या रात्रीच्या फोनबाबत शहाजीबापू पाटलांचा गौप्यस्फोट

रामदास कदम काय म्हणाले होते?

“बाळासाहेब ठाकरे वरुन पाहत असतील आणि म्हणत असतील माझा मुलगा शरद पवार, सोनिया गांधींच्या नादाला लागून बिघडला आहे. माझे विचार घेऊन पुढे चाल, माझे आशीर्वाद तुझ्यासोबत आहेत, असं ते सांगत असतील. पण आमचे उद्धव ठाकरे राष्ट्रवादीची भांडी घासतायत? आणि त्यांचा मुलगा खोके खोके म्हणत टुणटुण उड्या मारत आहे. मी बाळासाहेबांचा मुलगा आहे असं किती वेळा सांगणार? काही संशय आहे का? आम्ही कधी नाही म्हटलं आहे का? उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा नाही, असं कधी कोणी म्हणाल्याचं ऐकलंय का? तुम्हाला बाळासाहेबांचं नाव का सांगावं लागतं? तुमचं काही कर्तृत्व आहे का?” असे रामदार कदम म्हणाले होते.Source link

Leave a Reply