अरे हे घर आहे की….; vijay deverakondaचं घर पाहून तुम्हीही व्हाल अवाक्


Vijay Deverakonda House:  सध्या लायगर या चित्रपटाच्या निमित्ताने विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट पॅन इंडिया प्रदर्शित होणार असल्याने सध्या ते दोघंही मुंबई, पुणे, दिल्ली, हैद्राबादसारख्या शहरांपासून अख्ख्या भारतभर प्रमोशन्स करत आहेत. अनेकांना विजय देवरकोंडाबद्दल कुतूहल निर्माण झाले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की विजयने नुकतेच नवीन घर घेतले आहे आणि सध्या तो आपल्या याच आलिशान घरात राहत आहे. 

खरंतर विजय देवरकोडाचा परिचय सर्वांनाच आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीत आपले स्वतःचे वेगळे निर्माण केल्यानंतर विजय आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे त्यामुळे विजय चांगलाच चर्चेत आहे. लायगर हा त्याचा पहिला बॉलिवूड चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. विजयने आपली स्टार प्रतिमा अख्खा भारतात खूप लवकर निर्माण केली आहे. पण तूम्हाला माहिती आहे का की विजयही एवढ्या संपत्तीचा मालक असूनही अगदी चारचौघांसारखे सर्वसामान्य आयुष्य जगतो. 

विजय हैदराबादमध्ये राहतो. काही दिवसांपुर्वीच त्यांनी हैद्राबादमध्ये एक आलिशान घर घेतले आहे ज्याची किंमत समोर आलेल्या माहितीनूसार 20 कोटी रुपये आहे. विजयने स्वत: या आलिशान बंगल्याचे फोटो त्याच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केले आहेत जे खूप व्हायरल झाले आहेत. 

त्याने हा फोटो शेअर करताना असे लिहिले की, एवढं मोठं घर घेतल्यानंतर मी पहिल्यांदाच खूप घाबरलो आहे. पण एवढं मोठं घर घेऊनही मी अगदी साधी जीवनशैली जगतो.

यापूर्वी विजय १९९ रुपये किमतीची चप्पल परिधान करून लिगर चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला पोहोचला होता. हे पाहून चाहत्यांनी त्याच्या साधेपणाचे कौतुक केले.

विजयचे नाव सध्या रश्मिका मंदान्नासोबत जोडले जात आहे. कॉफी विथ करण 7 मध्ये देखील विजयने रश्मिकाला स्पेशल पर्सन म्हणून संबोधले होते. या त्याच्या व्यक्तव्यावर सगळीकडूनच चर्चांना उधाण आले होते. 



Source link

Leave a Reply