Pan Card मधील या दोन चुका पडतील भारी, १० हजाराचा दंड आणि ६ महिन्याची शिक्षा


नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून सतत ऐकायला मिळत आहे. पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करणे गरजेचे आहे. ही लिंक करण्याची अखेरची तारीख ३१ मार्च २०२३ आहे. आता पॅन संबंधी आणखी एक माहिती समोर येत आहे. जर कुणी सरकारच्या या आदेशाचे पालन केले नाही तर त्याला मोठा दंड भरावा लागू शकतो. जर तुम्ही सरकारकडून देण्यात आलेल्या आदेशाला मानले नाही ज्याला पॅन आणि आधार कार्डला लिंक करण्यास सांगितले आहे. असे करणे बंधनकारक आहे. परंतु, असे केले नाही तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.

१० हजाराचा दंड
इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या माहितीनुसार, जर तुम्ही ३१ मार्च आधी आधार पॅनला लिंक केले नाही तर त्या व्यक्तीला १० हजार रुपयाचा दंड भरावा लागू शकतो. तसेच ३१ मार्च नंतर ज्यांचे पॅन आणि आधार लिंक होणार नाहीत. त्या पॅन कार्डला बंद केले जाईल. त्यामुळे तुमचे पॅन कार्डचे सर्व कामे खोळंबली जावू शकतात. त्यामुळे तुम्ही ही काम तात्काळ करून घ्यायला हवीत.

वाचाः 6000mAh बॅटरी आणि 13 5G बँडसोबत २४ मार्चला येतोय सॅमसंगचा नवा फोन, पाहा डिटेल्स

जेलही होवू शकते
जर तुमच्याकडे दोन पॅन कार्ड सापडले तर तुम्हाला जेलची हवा सुद्धा खावी लागू शकते. असे करणे गुन्हा आहे. जर तुमच्याकडे दोन पॅन कार्ड असल्यास तुम्हाला एक पॅन कार्ड सरेंडर करावे लागेल. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला यासाठी ६ महिन्याची जेलची शिक्षा होवू शकते.

वाचाः Airtel यूजर्सला फ्री मध्ये मिळणार अनलिमिटेड 5G डेटा, असे करा Activate

वाचाः याला म्हणतात ऑफर! ३४ हजाराची ४३ इंच स्मार्ट टीव्ही मिळतेय १९ हजारात

Source link

Leave a Reply