Headlines

‘वो मेरा है…’; Ajay Devgan साठी चित्रपटाच्या सेटवरच अभिनेत्रींनी उपटल्या एकमेकिंच्या झिंज्या

[ad_1]

मुंबई : (Ajay Devgan Affairs ) अभिनेता अजय देवगन यानं ठराविक धाटणीचे चित्रपट साकारले. पण, त्याच्या प्रत्येत चित्रपटाला अफाट लोकप्रियता मिळाली. 90 च्या दशकामध्ये एकीकडे खान अभिनेत्यांची हवा असतनाच अजयनंही त्याचा प्रेक्षकवर्ग निर्माण करण्यात यश मिळवलं होतं. (Bollywood Actress raveena tandon karisma kapoor fight for ajay devgan )

हा अभिनेता फक्त चित्रपट आणि त्यातील भूमिकांमुळेच चर्चेत आला असं नाही, तर त्याच्या खासगी आयुष्याच्या चर्चाही कमाल रंगल्या. तुम्हाला कल्पनाही नसेल, पण अजयच्या प्रेमात दोन अभिनेत्री त्याच्यासाठी अक्षरश: वेड्या झाल्या होत्या. (Bollywood news)

90 च्या दशकांत त्याचं नाव ज्या अभिनेत्रींशी जोडलं गेलं, त्या होत्या करिष्मा कपूर आणि रवीना टंडन. या तिघांनीही नात्याला नकार दिला असला तरीही माध्यमं आणि कलाजगतातील इतर मंडळींच्या नजरेतून मात्र हे नातं लपलं नाही. 

अजय आणि रवीनानं बऱ्या चित्रपटांसाठी स्क्रीन शेअर केली होती. यादरम्यानच त्यांचं  प्रेम बहरलं. नात्यानं सर्वांच्या नजराही वळवल्या, पण एकाएकी अजयचं नाव करिष्माशी जोडलं गेलं. 

‘जिगर’ चित्रपटामध्ये अजय आणि करिष्मा एकत्र झळकले होते. या जोडीला चाहत्यांनी कमाल प्रेम दिलं. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच त्यांच्यातील जवळीक वाढली. रवीनाला डावलून आता अजच करिष्माच्या जवळ पोहोचला होता. 

तासन् तास फोनवर बोलण्यापासून लग्नाच्या चर्चांपर्यंत हे नातं पोहोचलं. पण, ही बातमी रवीनापर्यंत पोहोचली आणि तिचा संताप अनावर झाला. असं म्हटलं जातं, की जेव्हा या दोघी एका चित्रपटासाठी एकत्रच काम करत होत्या, तेव्हा परिस्थिती मारहाणीपर्यंत आली. 

वाद इतका वाढला की दोघींनी एकमेकींचे केस ओढण्यापर्यंत मजल गाठली. दोन अभिनेत्रींमध्ये झालेल्या या वादाला फार हवा मिळाली नसली, तरीही तो प्रसंग मात्र कोणीच विसरु शकलं नाही. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *