Hardik Pandya काही सुधरेना! शिवीगाळ प्रकरणानंतर आता थेट Rohit Sharma शी भिडला, Video व्हायरल


Hardik Pandya: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीज सुरु आहे. यातील पहिला सामना काल हैदराबादमध्ये खेळवला गेला असून भारताने या सामन्यात बाजी मारली. 12 रन्सने न्यूझीलंडवर मात करत सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामना शेवटच्या क्षणापर्यंत फार रंजक परिस्थितीत आला होता. सामन्यामुळे आलेलं प्रेशर दिसून येत होतं. अशातच कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि उपकर्णधार (Hardik Pandya) लाईव्ह सामन्यातच एकामेकांशी भिडले होते. 

पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडचा ऑलराऊंडर मायकल ब्रेसवेलने तुफान फलंदाजी करत टीम इंडियाला टेन्शनमध्ये आणलं होतं. एका क्षणी भारताचा पराभव होणार अशी चिन्ह दिसत असताना लॉर्ड शार्दुल ठाकूरने विकेट घेत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. 

Hardik Pandya आणि रोहित शर्मा भिडले

या सामन्यात शेवटच्या 2 ओव्हरमध्ये किवींच्या टीमला 24 रन्सची गरज होती. यावेळी कर्णधार रोहित शर्माने उपकर्णधार स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) ला गोलंदाजी दिली. 49 व्या ओव्हरचा पहिला बॉल टाकल्यानंतर रोहित आणि हार्दिक यांच्यामध्ये मोठा वाद झालेला पहायला मिळाला. यावेळी दोन्ही खेळाडू एकमेकांच्या योजनांशी सहमत नसल्याचं दिसून आलं. 

अखेरीस उपकर्णधार हार्दिक पंड्याला रोहित शर्मापुढे माघार घ्यावी लागली. रोहितच्या हावभावांवरून असं लक्षात येत होतं की, रोहित त्याला तो जे सांगतोय, तसंच कर असं म्हणतंय. दरम्यान या दोघांमध्ये झालेल्या कथित वादाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. 

विराट कोहलीवर केली होती दादागिरी

श्रीलंकेविरूद्धच्या एका सामन्यात पांड्यानं विराटला धाव घेण्यापासून रोखलं आणि त्याचा हा निर्णय विराटला पटला नाही. त्यानं डोळ्यातूनच धाक देत पांड्याला आपण नाराज असल्याचं स्पष्ट केलं. यावेळी पांड्यानं काही कारणास्तव त्याच्या नजरेला नजरच दिली नाही. यानंतर सामन्यादरम्यान आणखी एका क्षणीसुद्धा त्यांच्यामध्ये असं काही घडलं की इथंही विराटचे संतप्त हावभाव सर्वांनीच पाहिले. 

हार्दिक पांड्याने केली शिवीगाळ

कोलकात्याच्या इडन गार्डनवर भारत आणि श्रीलंकादरम्यान दुसरा एकदिवसीय (India vs Sri Lanka 2nd ODI) सामना खेळवण्यात आला. भारतीय संघाची पहिली गोलंदाजी होती. सामन्याच्या दहाव्या षटकानंतर कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) चेंडू हार्दिक पांड्याच्या हाती सोपवला. याचदरम्यान हार्दिक पांड्याने एक मोठी चूक केली. हार्दिक पांड्याने डग आऊटमध्ये बसलेल्या ज्युनिअर खेळाडूकडे पाणी मागितलंहोतं. पण ते न आल्याने हार्दिक संतपला, यावेळी कॅमेरासमोर शिवीगाळ करताना तो दिसतोय. आधीच्या षटकात पाणी मागितलं होतं, अजून आलं नाही, “तिथे बसून  काय XXX आहात’ असे अपशब्द त्याने वापरले.Source link

Leave a Reply