सामना सोडून Hardik Pandya चं डान्सवरच अधिक लक्ष; फिल्डींग करताना लगावले ठुमके!


Hardik Pandya: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सीरिज सुरु असून दुसरा वनडे सामना रायपूरमध्ये खेळवला जातोय. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय टीम इंडियासाठी (Team India) चांगलाच फायदेशीर ठरला असून किवींची टीम अवघ्या 108 रन्सवर ऑलआऊट झाली. दरम्यान यावेळी सामन्यातील हार्दिक पंड्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral Video) होताना दिसतोय. 

लाईव्ह सामन्यात Hardik Pandya ने लगावले ठुमके

न्यूझीलंड फलंदाजी करत असताना कुलदीप यादव 22 वी ओव्हर टाकत होता. या ओव्हरच्या चौथ्या बॉलनंतर कॅमेरा टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्याकडे गेला. यावेळी बाऊंड्रीजवळ पोहोचल्यानंतर त्याने डान्स केल्याचं कॅमेरात कैद झालं आहे. मुख्य म्हणजे यावेळी हार्दिक कोणत्या बाजूला उभं राहू, असं विचारत होता. मात्र तो डान्स करत असल्यासारखं व्हिडीओमध्ये दिसतंय.

दरम्यान हार्दिक पंड्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हार्दिक पंड्याचा हा अनोखा अंदाज चाहत्यांना मात्र आवडला आहे. शिवाय या सामन्यामध्ये हार्दिक पंड्याने घेतलेल्या एका कॅचची खूप चर्चा होतेय.

सोशल मीडियावर पंड्याचं कौतुक

सोशल मीडियावर हार्दिक पांड्याच्या झेलचं कौतुक होत आहे. हार्दिक तळाशी असलेला कठीण झेल डाव्या हाताने पकडला. हा झेल पाहून क्रीडा समीक्षकही आवाक् झाले. यानंतर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला आहे. नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवत व्हायरल व्हिडीओ शेअर केला आहे. 

भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

न्यूझीलंडचा संघ- फिन एलन, डेवोन कॉनवे, हेन्री निकोल्स, डेरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार), ग्लेन फिलीप्स, मायकेल ब्रासवेल, मिशे सँटनर, हेन्री शिप्ले, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर  Source link

Leave a Reply