Happy Birthday : माधुरी – संजय यांची ‘अधुरी एक कहाणी’, ती एक घटना ज्यामुळे…


मुंबई : संजय दत्त हा बॉलिवूडमधील एक असा अभिनेता आहे ज्याचं खासगी आयुष्य खूप चर्चेत आलं. संजय दत्तच्या बायोपिकवरून देखील अनेक वाद निर्माण झालेत. यामध्ये अनेक विवादांसोबत त्यांच खासगी आयुष्य दाखवण्यात आले. संजय दत्त आणि माधुरी यांची लव्हस्टोरी ‘अधुरी प्रेम कहाणी’ म्हणूनच चर्चेत आली. संजय दत्तच्या आयुष्यातील तो सर्वात मोठा भाग आहे. अनेकदा संजय दत्त याबाबत मोकळेपणाने व्यक्त झाला आहे. मात्र माधुरी या नात्यावर कधीच बोलत नाही. 

‘रॉकी’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा संजय दत्त आपल्या लूकमुळे खूप चर्चेत आला आणि बॉलिवूडचा स्टार बनला. 90 च्या दशकात संजय दत्त उत्तम नायकांच्या यादीत होता. तर माधुरीने ‘अबोध’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 80 च्या दशकात आपल्या करिअरला वेगळ्याच उंचीवर नेलं. 

‘तेजाब’ आणि ‘दिल’सारख्या सिनेमात माधुरीचा सिनेमा बॉक्स ऑफिस आणि दर्शकाच्या मनात नंबर 1 ठरला. याच दरम्यान ‘साजन’ सिनेमातून दोघांच्या प्रेमाची सुरुवात झाली. सिनेमात संजय दत्त आणि माधुरी सोबत सलमान खान देखील होता. सिनेमा दरम्यान माधुरी-संजय एकमेकांच्या प्रेमात पडले. 

‘तेजाब’ आणि ‘दिल’सारख्या सिनेमात माधुरीचा सिनेमा बॉक्स ऑफिस आणि दर्शकाच्या मनात नंबर 1 ठरलं. याच दरम्यान ‘साजन’ सिनेमातून या दोघांनी प्रेमाची एक गोष्ट लिहायला सुरूवाच केली. या सिनेमात संजय दत्त आणि माधुरी सोबत सलमान खान देखील होती. याच सिनेमा दरम्यान माधुरी-संजय एकमेकांच्या प्रेमात पडले. 

प्रेमात पडल्यानंतर खास व्यक्तीसोबत वेळ व्यतीत करता यावा म्हणून संजय आणि माधुरी सेटवर लपून वेळ घालवाचे. तर दुसरीकडे संजय दत्तचं पहिलं लग्न माधुरीसाठी डोकेदुखी ठरलं. संजय दत्तला मुलगी देखील होती. याची परवा न करता दोघांनी ‘खलनायक’ सिनेमा साइन केला. 

‘खलनायक’ सिनेमात आले आणखी जवळ 
‘खलनायक’ सिनेमाच्या दरम्यान यांची मैत्री आणि प्रेम आणखी फुलत गेलं आणि पुढे मोठं संकट येणार असल्याची चाहूल माधुरीला लागली.  कारण संजयच्या पत्नीला पतीच्या अफेअर बद्दल कळालं आणि संजयच्या संसार संपला. संजयची पहिली पत्नी मुलीला घेऊन अमेरित गेली. 

संजय दत्तच्या अटकेमुळे नातं तुटलं 
दोघांमधील प्रेम वाढत असताना एका घटनेमुळे दोघे कायमचे विभक्त झाले. संजय दत्तला आर्म्स ऍक्ट अंतर्गत अटक करण्यात आली. त्यावेळी संजय दत्त तब्बल 16 महिने कारागृहात होता. या दरम्यान खलनायक सिनेमा रिलीज होऊन हिट देखील झाला. 

माधुरीने आपला मार्ग बदलला 
संजय दत्त अगदी कठीण प्रसंगातून जात होता मात्र तेव्हा माधुरीने त्याचा साथ दिली नाही. 16 महिने संजय कारागृहात होता मात्र माधुरी संजयला एकदा देखील भेटली नाही. याच कारणामुळे या दोघांच्या नात्यात दूरावा निर्माण झाला. आता दोघेही त्यांच्या आयुष्यात फार पुढे निघून गेले आहेत. Source link

Leave a Reply