हंस चुगेगा दाना… कौआ मोती खाएगा; मराठमोळ्या अभिनेत्रीकडून कलाविश्वाचा हादरवणारा चेहरा पहिल्यांदाच समोर


मुंबई : कलाजगतात दर दिवशी काही चेहरे नव्यानं आपल्या कारकिर्दीची सुरुवात करु पाहतात. पण, यातल्या सर्वांनाच यश मिळतं असं नाही. प्रत्येकजण बच्चन किंवा कपूर होत नाही. पण, किमान यशस्वी होण्याची अपेक्षा आणि आशा प्रत्येकजण उराशी बाळगताना दिसतो.

कलाजगतामध्ये तग धरण्यासाठीसुद्धा काही मंडळी भलतीच तंत्र आजमावतात. काहींना मात्र आपल्या सिद्धांतांना सोडून वागता येणं शक्य नाही. अशाच काहीजणांमधील एक नाव म्हणजे अभिनेत्री मीनल बाळ.

मराठी चित्रपट आणि मालिकांतून झळकलेल्या मीनलनं एक सोशल मीडिया पोस्ट लिहित त्यामध्ये मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

‘प्रामाणिक पणे खूप मनापासून सिंसीयरली काम करणं, विचार करून चांगलं काम करण्याची धडपड,संयम,श्रध्दा, मेहनतीचं फळ वगैरे सब झूठ है!!!

कोणाच्या तरी मागे मागे करा, करेक्ट लोकांच्या संपर्कात रहा, एखाद्या ग्रुपशी संलग्न रहा,खूप गोड (खोटं खोटं) वागा आणि बास झालं काम. मग काय कामा वर काम मिळत राहणार आणि मग वर वर काम केलं तरीही किंवा काम येत नसेल तरीही फरक पडणार नाही . तुमच्या डोक्यावर क्राऊन हा असणारच आणि मग त्याचाच रुबाब (attitude) करायचा ’, असं तिनं इथं लिहिलं.

प्रसिद्ध होण्याचा हा नाही का एक मार्ग, असं म्हणत तिनं इथं उपरोधिक टोलाही लगावला. मीनलच्या या पोस्टमुळं कलाजगताचा आणखी एक चेहरा समोर आला. जो अनेकांच्या भुवया उंचावून गेला. 

तिचं हे वक्तव्य वाचत असताना अनेकांनी याच्याशी आपल्या दैनंदिन जीवनातील प्रसंग जोडून पाहिले आणि तिच्या पोस्टवर काहीजण व्यक्तही झाले. Source link

Leave a Reply