हॅण्डसम दिसणं अभिनेत्यासाठी ठरलं शाप; जे घडलंय त्याचा तुम्ही विचारही करणार नाही


मुंबई : तुमच्या आवडीचा अभिनेता नेमका कसा ठरवता? असं विचारल्यास काही निकषांच्या आधारावर आपण आवडता अभिनेता ठरवतो असं उत्तर समोर येतं. आता मुद्दा असा की हे निकष कोणते? तर यामध्ये शरीरयष्टी, व्यक्तीमत्वं आणि अर्थातच देखणा चेहरा यांचा समावेश असतो. 

देखणा चेहरा असणारे कित्येक कलाकार आज हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करत आहेत. पण, एक चेहरा मात्र सर्वकाही असूनही या प्रसिद्धीझोतात येऊच शकला नाही. (Bollywood)

अपयश मिळावं, पण त्याची कारणंही पवण्याजोगी असावीत कारण आपल्या वाट्याला आलेल्या अपयशाची सल या चेहऱ्याच्या अर्थात या अभिनेत्याच्या मनात राहिली. आपल्या अभिनय कौशल्याचा या कलाविश्वात पूरेपूर वापर केला न गेल्याचं तो म्हणाला आहे. 

हा अभिनेता आहे डिनो मोरेया. मला वेगळ्या नजरेतून पाहण्यासाठी दिग्दर्शकांना धाडस दाखवावं लागेल, असं म्हणणाऱ्या डिनोनं हा दृष्टीकोनच कधी दिसला नसल्याचं म्हटलं. 

‘मला कायम हिच प्रतिक्रिया मिळाली, की मी फार चांगला दिसत आहे. मला ऐकायलाच हे फार विचित्र वाटतं. कारण एका पात्रासाठी माझी निवड करण्यामागे माझ्या दिसण्याचा काय संबंध? 

माझी निवड तर करा, मी स्वत:मध्ये बदल करतो. मला दिसण्याच्या पलीकडे लोकांनी कधी पाहिलंच नाही. कधीकधी चांगलं दिसणंसुद्धा या बॉलिवूडमध्ये तुमच्या विरोधात जाताना दिसतं’, असं तो म्हणाला. 

आपण चांगल्या दिग्दर्शकांसोबत काम करण्यासाठी उत्सुक असल्याचं त्यानं सांगत, येत्या काळात चांगले प्रोजेक्ट आपल्यापर्यंत नक्कीच येतील याची आशाही त्यानं व्यक्त केली. Source link

Leave a Reply