Headlines

Hacking: तुम्हाला आलेला SMS फेक तर नाही ? ‘असे’ करा माहित, या टिप्स करतील मदत, टाळता येईल नुकसान

[ad_1]

नवी दिल्ली:Smartphone Hacking: स्पॅम मेसेजमुळे आजकाल सगळेच त्रस्त आहेत असून यातील अनेक मेसेजेस फेक असतात, जे युजर्सची दिशाभूल करण्यासाठी पाठवले जातात. यामध्ये बनावट क्रमांक किंवा ईमेल आयडी असतात. परंतु कधी-कधी असे संदेश ओळखणे खूप कठीण होते. कारण, अनेक वेळा आपल्याला आलेला मेसेज खोटा आहे की खरा हे ठरवता येत नाही . पण, हे खूप कठीण देखील नाही. यासाठी काही टिप्स फॉलो कराव्या लागतील. अनोळखी व्यक्तीकडून आलेल मेसेज कधी कधी तुमच्यासाठी धोक्याचे लक्षण असू शकते. तुमच्याकडे आलेला मेसेज पाठवणारा तुम्हाला माहीत नसेल, तर या मेसेजकडे दुर्लक्ष करा. असे मेसेज अनेकदा स्पॅम असतात.

वाचा: Smartphone Heating : तुमचा स्मार्टफोन देखील वारंवार गरम होत असेल तर वेळीच द्या लक्ष , अन्यथा होईल मोठे नुकसान

फेक मेसेज आला असेल तर त्यात शुद्धलेखनाच्या चुका असतील . कारण, स्पॅमर्स व्याकरण किंवा स्पेलिंगकडे जास्त लक्ष देत नाहीत. जर तुम्हाला एरर असलेला मजकूर मिळाला आणि तो तुमच्या मित्रांनी कोणीही पाठवला नसेल, तर हा मेसेज खोटा आहे. तसेच , जर एखादा मेसेज तुम्हाला मोफत भेटवस्तू देण्याचा दावा करत असेल, तर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जर तुम्हाला मेसेजमध्ये सांगण्यात आले की तुम्ही लॉटरी जिंकली आहे किंव मोठी रक्कम मिळाली आहे, तर तुम्ही अशा मेसेजकडे दुर्लक्ष करा.

वाचा: नवीन फोनवर अपग्रेड करण्याआधी पाहा Mid Range स्मार्टफोन्सची ही लिस्ट, फीचर्स प्रिमिअम, किंमत २५,००० पेक्षा कमी

एखादी मेसेज तुम्हाला त्वरित एखादी कारवाई करण्यास सांगत असेल. तर, सावधगिरी बाळगा. अनेक वेळा असे मेसेज येतात. ज्यात लगेच केवायसी करून घेण्यास सांगितले जाते किंवा एखाद्याला ताबडतोब पैसे पाठवण्यास सांगितले जाते. असे मेसेज खूप धोकादायक असतात.

तसेच, अनोळखीच्या व्यक्तीकडून आलेल्या लिंकवर कधीही टॅप करू नका. अशा लिंक्स फिशिंग साइटकडे नेऊ शकतात किंवा मालवेअर असू शकतात. लक्षात ठेवा, कोणतीही वित्तीय संस्था ग्राहकांशी Text Message वर संपर्क साधत नाही. अशात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. बर्‍याचदा, स्पॅमरना तुमचे खाते कोणत्या बँकेत आहे हे माहित नसते, त्यामुळे तुम्हाला खाते नसलेल्या बँकेकडून मजकूर मेसेज प्राप्त होऊ शकतात. अशा मेसेजवर विश्वास ठेवण्यापूर्वी तुमच्या बँकेशी संपर्क साधा.

वाचा: Smartphone Offers: ‘ या’ पॉप्युलर कंपनींच्या स्मार्टफोन्सच्या किमतीत कपात, लिस्टमध्ये बजेट ते फ्लॅगशिप फोन्स

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *