‘हा, मी घाबरत…’ मलायका अरोरा Single Mother म्हणून कसे दिवस काढतेय?


मुंबई : अभिनेता अरबाज खान आणि अभिनेत्री मलायका अरोरा आता एकत्र नाहीत, पण एक काळ असा होता जेव्हा चित्रपटसृष्टीत ही जोडी बेस्ट कपल म्हणून चर्चेत होती. त्यांची केमिस्ट्री सगळ्यांना फार आवडायची.

अरबाज खान आणि मलायका पहिल्यांदा एका फोटोशूट दरम्यान भेटले होते, जवळपास 4-5 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 1998 मध्ये त्यांनी लग्न केले.

या लग्नातून अरबाज आणि मलायकाला अरहान खान हा मुलगा आहे.  मलायका आणि अरबाजने लग्नाच्या 19 वर्षानंतर 2017 मध्ये घटस्फोट घेतला, ज्यामुळे सगळ्यांना धक्का बसला.

या घटस्फोटानंतर मलायकाला मुलगा अरहानची कस्टडी मिळाली. एका मुलाखतीत मलायकाने सिंगल मदर असणं आणि तिच्या मुलाच्या कस्टडीशी संबंधित तिचे अनुभव शेअर केले आहेत.

मलायका म्हणते, ‘जेव्हा मी सिंगल मदर व्हायचं ठरवलं, तेव्हा वाटलं होतं की एवढी मोठी जबाबदारी मी एकटी कशी पुर्ण करणार?

मला वाटतं की, हे खूपच सामान्य रिएक्शन आहे. पुढे मलायका म्हणाली, मुलाची कस्टडी मलाचं घ्यायची आहे हे मी ठरवलं होतं. मला जबाबदार बनायचं आहे, कारण माझा मुलगा मोठा होत आहे आणि या काळात त्याला माझी गरज आहे.

मला त्याच्यासाठी चांगलं उदाहरण बनायचं आहे. त्याला चांगल्या मार्गावर घेऊन जायचं आहे. अशावेळी मला हे देखील वाटतं की, तो स्वत:च्या चुकांमधून शिकेल आणि पुढे जाईल.”

मलायका म्हणते, “हा, मी घाबरत होते. मी कमकुवत आहे असं वाटत होतं आणि या सगळ्या गोष्टींसोबत मला समाजातील प्रत्येक गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे. तेव्हा मी फक्त हा विचार करत होते की, मला एक वर्किंग सिंगल मदर बनायचं आहे.जर मी स्वत:ची काळजी घेऊ शकले नाही, तर मुलाची काळजी कशी घेणार?”Source link

Leave a Reply