Gyanvapi Masjid : ….गरज नाही; कंगनाच्या ‘ज्ञानव्यापी’ वक्तव्यानं वादाला तोंड फुटणार?


मुंबई : संपूर्ण देशभरात सुरु असणाऱ्या वाराणासीतील ज्ञानव्यापी मशिदीच्या वादात आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिनंही उडी घेतली आहे. आगामी ‘धाकड़’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कंगनानं नुकतीच भेट दिली. (Kangana Ranaut On Gyanvapi Masjid Case) 

इथं तिनं मंदिराबाहेर माध्यमांशी संवाद साधताना केलेल्या वक्तव्यानं, या संपूर्ण वातावरणात नव्या वादाला तोंड फुटणार का याचीच भीती अनेकांनी व्यक्त केली. 

कायमच आपले विचार जाहीरपणे व्यक्त करणाऱ्या कंगनानं काशीच्या कणाकणात शिवशंकराचा वास आहे, असं वक्तव्य केलं. 

माध्यमांच्या प्रश्नाचं उत्तर देत तिनं लिहिलं, ‘जसं मथुरेच्या कणाकणात श्रीकृष्ण आहेत, अयोध्येच्या कणाकणात श्रीराम आहेत, तसंच काशीच्या कणाकणात महादेवाचा वास आहे. त्यांना कोणत्याही साचेबद्ध वास्तूची गरज नाही’ असं ती म्हणाली. 

हर हर महादेव! असा जयघोष करत यावेळी कंगनानं खणखणीत आवाजात ज्ञानपीठ वादावर आपली भूमिका स्पष्ट झाली.  सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. 

मागील काही दिवसांपासून कंगना तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी विविध कार्यक्रम आणि ठिकाणांना भेट देताना दिसत आहे. कंगनाच्या नावाभोवती असणारं वलय पाहता, ती जिथं जिथं जातेय तिथं प्रत्येक ठिकाणी चर्चांना उधाण येत आहे. 

ज्ञानव्यापीचा मुद्दा असो किंवा मग भोंग्यांचा…. कंगनापुढे असेच प्रश्न ठेवले जात आहेत. ज्यांची उत्तरंही ती तिच्याच अंदाजात देत आहे. 

या साऱ्याचा फायदा कंगनाच्या चित्रपटालाही होत आहे. कारण, कंगना चर्चेत येतेय तेव्हा तेव्हा ओघानंच तिच्या आगामी चित्रपटाच्या चर्चांनाही वाव मिळत आहे. Source link

Leave a Reply