Guru Margi 2022: अखेर गुरू मीन राशीत मार्गस्थ, पाच महिने या राशींसाठी फायद्याचे, नंतर…


Guru Margi In Meen Rashi: वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाला देवगुरुचा दर्जा देण्या आला आहे. तसेच गुरु ग्रहाला शुभ ग्रह मानलं जातं. कुंडलीत गुरु ग्रह चांगल्या स्थितीत असल्यास भागोदय होतो. व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळतं. त्यामुळे कुंडली पाहताना ज्योतिष गुरुची स्थिती पाहतात. दुसरीकडे गोचर कुंडलीनुसार गुरु स्थिती काय याकडेही ज्योतिष जाणकारांचं लक्ष लागून असतं. सध्या गुरु ग्रह स्वत:च्या मीन राशीत असून 24 नोव्हेंबर 2022 पासून मार्गस्थ झाला (Guru Grah Margi) आहे. त्यामुळे काही राशींना शुभ, तर काही राशींना अशुभ परिणाम जाणवणार आहे. पाच महिन्यानंतर गुरु ग्रह गोचर करणार आहेत. गोचर कुंडलीनुसार 22 एप्रिल 2023 रोजी गुरु ग्रह मेष राशीत प्रवेश करणार (Guru In Mesh Rashi) आहेत. त्यामुळे 24 नोव्हेंबर 2022 पासून 22 एप्रिल 2023 पर्यंतचा काळ पाच राशींसाठी अनुकूल असणार आहे. 

वृषभ- गुरु मार्गस्थ झाल्याने या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. करिअर निगडीत समस्यांचं समाधान मिळेल. कामाच्या ठिकाणी आनंददायी वातावरण असणार आहे. उत्पन्नात अचानक वाढ होईल.

कर्क- गुरु स्थिती कर्क राशीसाठी फलदायी आहे. नोकरी आणि व्यवसायात चांगले परिणाम दिसून येतील. अडकलेले पैसे मिळतील. नशिब आणि जवळच्या मित्रांची साथ मिळेल. आरोग्याशी निगडीत समस्यांचं समाधान मिळेल. 

कन्या- गुरु मार्गस्थ स्थिती कन्या राशीसाठीही अनुकूल आहे. नोकरदार आणि व्यापाऱ्यांना फायदा होईल. अडकलेली काम झटपट मार्गी लागतील. पद, पैसा, प्रतिष्ठा या काळात वाढेल. तसेच जुने वाद संपुष्टात येतील.

बातमी वाचा- Vastu Shastra: ‘या’ पाच वस्तू तिजोरीत ठेवल्याने होईल भरभराट, समुद्र मंथनाशी आहे संबंध 

वृश्चिक- गुरुची स्थिती वृश्चिक राशीसाठी फलदायी ठरणार आहे. नोकरीत पदोन्नती आणि पगारवाढीचा योग आहे. उद्योगासाठी सुवर्णकाळ आहे. मेहनतीला पूर्ण फळ मिळेल. आरोग्य चांगलं राहील. 

कुंभ- देवगुरु बृहस्पतीच्या मार्गक्रमणामुळे आर्थिक उन्नती होईल. नोकरी करणाऱ्यांना यश मिळेल. तर व्यवसायिकांना पाच महिने आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरतील. 

या राशींना सांभाळून राहावं

देवगुरू बृहस्पतींच्या मार्गक्रमणामुळे तूळ, धनु, मीन आणि मिथुन राशींवर सर्वसाधारण प्रभाव राहील. तर मेष, सिंह आणि मकर राशीच्या लोकांना सांभाळून राहावं लागेल. गुंतवणूक करताना काळजी घ्यावी अन्यथा धनहानी होण्याची शक्यता आहे. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)Source link

Leave a Reply