Gupt Navratri 2023 : आजपासून गुप्त नवरात्रीला सुरुवात, आर्थिक प्रगतीसाठी 9 दिवस करा ‘हे’ सोपे उपाय


Magh Gupt Navratri 2023 Upay : वर्षातून दोन गुप्त नवरात्री येतात. पहिली चैत्र आणि दुसरी शारदीय नवरात्री…आजपासून माघ महिन्यातील गुप्त नवरात्री सुरु झाली आहे. गुप्त नवरात्रीचे हे व्रत मनोकामना पूर्ण करण्यासाठी पाळलं जातं. गुप्त नवरात्रीचे नऊ दिवस देवी सतीपासून प्रकट झालेल्या 10 महाविद्यांना समर्पित आहेत. गुप्त नवरात्रीमध्ये 10 माँ काली, तारा देवी, त्रिपुरा सुंदरी, माँ भुवनेश्वरी, माँ चिन्नमस्ता, त्रिपुरा भैरवी, माँ ध्रुमावती, मां बांगलामुखी आणि माता मातंगी यांची पूजा केली जाते. (magh gupt navratri 22 january 2023 shubh muhurat timing ghatsthapna muhurat pujan vidhi keelak stotram path upay and remedies for money in marathi)

गुप्त नवरात्री 2023 शुभ मुहूर्त (shubh muhurat)

प्रतिपदा तिथी पहाटे 2.22 पासून सुरु झाली असून ती रात्री 10.27 ला समाप्त होणार आहे. 

घटस्थापना मुहूर्त – सकाळी 9.59 ते 10.46 पर्यंत 

माघ गुप्त नवरात्री उपाय (Gupt Navratri 2023 Upay)

1. माँ दुर्गासमोर दोन तोंडी तुपाचा दिवा लावावा आणि 9 दिवस कीलक स्तोत्राचे पठण करा. 

2. 9 दिवस ब्रह्मचर्य पाळा आणि फक्त शुद्ध आहार घ्या. 

3. दुर्गापूजा-पठण आणि मंत्रांचे जप नियमांचे पालन करा. 

4. घरात कोणी आजारी असल्यास माँ दुर्गाला लाल फुलं अर्पण करा.

5. धन समृद्धीसाठी घरात सोन्या चांदीची नाणी आणा. 

6. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी माँ दुर्गाला गुग्गलाचा सुगंधित धूप अर्पण करा. 

7.  गुप्त नवरात्रीमध्ये घरात मोराची पिसे आणणं शुभ मानलं जातं. 

या गोष्टी करु नका !(Gupt Navratri Donts) 

1. केस आणि नखे कापू नयेत. 

2. चुकूनही मामसिक आहार घेऊ नका. 

3. ब्रह्मचर्य पाळणे आवश्यक आहे. 

4. चामड्याची कोणतीही वस्तू वापरु नका. 

गुप्त नवरात्रीत या मंत्राचा जप करा!

कीलक स्तोत्र पाठ (Keelak Stotram Path)

ॐ अस्य श्री कीलक स्तोत्र महामंत्रस्य। शिव ऋषि:। अनुष्टुप् छन्द:

महासरस्वती देवता। मंत्रोदित देव्यो बीजम्। नवार्णो मंत्रशक्ति।

श्री सप्तशती मंत्र स्तत्वं स्री जगदम्बा प्रीत्यर्थे सप्तशती पाठाङ्गत्वएन जपे विनियोग:।

ॐ विशुद्धज्ञानदेहाय त्रिवेदीदिव्यचक्षुषे। श्रेयःप्राप्तिनिमित्ताय नमः सोमार्धधारिणे।।1।।

सर्वमेतद्विजानीयान्मंत्राणामभिकीलकम्। सोऽपि क्षेममवाप्नोति सततं जप्यतत्परः।।2।।

सिद्ध्यन्त्युच्चाटनादीनि वस्तूनि सकलान्यपि। एतेन स्तुवतां देवीं स्तोत्रमात्रेण सिद्धयति।।3।।

न मंत्रो नौषधं तत्र न किञ्चिदपि विद्यते। विना जाप्येन सिद्ध्येत सर्वमुच्चाटनादिकम्।।4।।

समग्राण्यपि सिद्धयन्ति लोकशङ्कामिमां हरः। कृत्वा निमंत्रयामास सर्वमेवमिदं शुभम्।।5।।

स्तोत्रं वै चण्डिकायास्तु तच्च गुप्तं चकार सः। समाप्तिर्न च पुण्यस्य तां यथावन्निमंत्रणाम्।।6।।

सोऽपि क्षेममवाप्नोति सर्वमेव न संशयः। कृष्णायां वा चतुर्दश्यामष्टम्यां वा समाहितः।।7।।

ददाति प्रतिगृह्णाति नान्यथैषा प्रसीदति। इत्थं रूपेण कीलेन महादेवेन कीलितम्।।8।।

यो निष्कीलां विधायैनां नित्यं जपति संस्फुटम्। स सिद्धः स गणः सोऽपि गन्धर्वो जायते नरः।।9।।

न चैवाप्यटतस्तस्य भयं क्वापीह जायते। नापमृत्युवशं याति मृतो मोक्षमवाप्नुयात्।।10।।

ज्ञात्वा प्रारभ्य कुर्वीत न कुर्वाणो विनश्यति। ततो ज्ञात्वैव सम्पन्नमिदं प्रारभ्यते बुधैः।।11।।

सौभाग्यादि च यत्किञ्चिद् दृश्यते ललनाजने। तत्सर्वं तत्प्रसादेन तेन जप्यमिदम् शुभम्।।12।।

शनैस्तु जप्यमानेऽस्मिन् स्तोत्रे सम्पत्तिरुच्चकैः।भवत्येव समग्रापि ततः प्रारभ्यमेव तत्।।13।।

ऐश्वर्यं तत्प्रसादेन सौभाग्यारोग्यसम्पदः। शत्रुहानिः परो मोक्षः स्तूयते सा न किं जनैः।।14।।

।।इति श्रीभगवत्याः कीलकस्तोत्रं समाप्तम्।।

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)Source link

Leave a Reply