Gupt Navratri 202 : ‘या’ राशींसाठी गुप्त नवरात्र अतिशय शुभ; होणार धनलाभ


Gupt Navratri 2023 Zodiac Signs : हिंदू धर्मात माघ महिन्याला विशेष महत्त्व आहे. अनेक ठिकाणी माघी गणेशत्सोव साजरा करण्यात येतो. अनेकांना माहिती नाही पण माघ महिन्यात नवरात्रदेखील साजरी करण्यात येते. या नवरात्रीला गुप्त नवरात्र असं म्हणतात. गुप्त नवरात्रीची सुरुवात माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून होते. येत्या रविवारी 22 जानेवारी 2023 पासून नवरात्रीला सुरुवात होईल. हा सोहळा 30 जानेवारीपर्यंत असणार आहे. हा गुप्त नवरात्रीचा काळ काही राशींसाठी धनलाभ घेऊन आला आहे. तुमची रास कुठली आहे. (Magh Gupt Navratri 2023 Date sunday 22 January 2023 People of this zodiac sign will get money marathi news)

‘या’ राशींचं भाग्य चमकेल 

मेष (Aries)

नोकरीदारांसाठी हा काळ शुभ असणार आहे. जर या राशींचे लोक नोकरीच्या शोधात असतील तर त्यांची प्रतीक्षा संपणार आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. 

कन्या  (Virgo)

या राशींसाठी हा काळ खूप चांगला असणार आहे. नोकरी – व्यवसायात प्रगती आणि तेजी दिसणार आहे. नवीन कपडे, दागिने खरेदी कराल. या काळात एखादी मोठी इच्छा पूर्ण होणार, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 
  

वृश्चिक (Scorpio)

या काळात या राशींच्या लोकांना आनंदाची बातमी मिळेल त्यामुळे उत्साहाचं वातावरण असेल. अडकलेले पैसे मिळतील. अचानक आर्थिक लाभ झाल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती बळकट होईल. 

मकर (Capricorn)

मकर राशींच्या लोकांसाठी हा उत्तम काळ असणार आहे. कायदेशीर आणि कोर्टकचेरीचे वाद मिटतील त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. धार्मिक किंवा कौटुंबिक सहलीचा योग आहे. धनलाभ होण्याचीही संधी आहे. 
 

मीन (Pisces)

या राशींच्या लोकांना उत्तम संधी चालून येणार आहे ती गमवू नका. तुमच्या बुद्धीच्या जोरावर मोठी समस्या सोडवू शकाल. एखाद्या खास व्यक्तीकडून तुम्हाला मदत होणार आहे. त्याचा तुम्हाला लाभ होणार आहे. व्यवसायामध्ये तेजी दिसून येणार आहे. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)Source link

Leave a Reply