Guess Who: फोटोतील ‘या’ चिमुरडीला ओळखलत का? सलमान खान सोबत आहे खास कनेक्शन


Jackline Fernandez Childhood Photos: बॉलीवूड स्टार्सचे कलाकारांच्या लहानपणीचे फोटो हे चाहत्यांना खूप आवडतात. काही फोटोमध्ये बॉलीवूड कलाकार अजिबातच ओळखता येत नाहीत. सध्या अशाच एका अभिनेत्रीचा लहानपणीचा फोटो सध्या व्हायरल होतो आहे, तुम्ही तिचा फोटो पाहून तिला ओळखू शकता का? (bollywood diva jackline fernandez childhood photos goes viral guess who)

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती जॅकलिन फर्नांडिस आहे. जॅकलिनं 2009 मध्ये तिच्या करिअरला सुरुवात केली आहे. रितेश देशमुखच्या अल्लदीन या चित्रपटातून तिनं रूपेरी पडद्यावर पदार्पण केले आहे. 

जॅकलिनचा पहिला चित्रपट चालला नाही. त्यानंतर तिने ‘जाने कहां से आई’ (Jane Kaha Se Aai Hai), ‘हाऊसफुल’ (Housefull), मर्डर 2 (Murder), हाऊसफुल 2 (Housefull 2), रेस 2 (Race 2) आणि किक सारखे हिट चित्रपट केले आहेत. या चित्रपटांनी जॅकलिनला चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली. ब्रदर्स 3 (Brothers 3), हाऊसफुल 3 (Housefull 3), ढिशूम (Dhishum), ए फ्लाइंग जट (A Flying Jet), ए जेंटलमन (A Gentlemen), जुडवा 2 (Judwa 2), बागी 2 (Baghi 2), रेस 3 (Race 3), भूत पोलिस (Bhoot Police), बच्चन पांडे (Bachchan Pandey) आणि अटॅक (Attack) यांसारख्या चित्रपटांमध्येही तिनं काम केले. 

काही दिवसांपासून जॅकलिनला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कॉनमन सुकेश चंद्रशेखरच्या (Sukesh Chandrashekar Case) 200 कोटींच्या फसवणूक प्रकरणातही जॅकलिनचे नाव जोडले गेले आहे. सुकेशने जॅकलिनला अनेक लक्झरी गिफ्ट्स दिल्या. यासोबतच सुकेश आणि जॅकलीनही रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे आता जॅकलीन या प्रकरणात अडकली आहे. अलीकडेच दिल्ली पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले होते, जिथे तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले.

जॅकलिन लवकरच राम सेतू आणि सर्कसमध्ये दिसणार आहे. राम सेतूमध्ये अक्षय कुमार, जॅकलिन आणि नुसरत भरुचा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सर्कसमध्ये ती रणवीर सिंग आणि पूजा हेगडेसोबत दिसणार आहे.Source link

Leave a Reply