Guess Who : ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?


Celeb Childhood Photo:  सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले फोटो असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्रीला (Bollywood Actress) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्रीचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला ही अभिनेत्री ओळखायची आहे. 

फोटोत काय?

फोटोत तुम्ही पाहू शकता एक चिमुकली मुलगी आहे. या चिमुकलीने छानसा पांढऱ्या रंगाचा फ्रॉक घातलेला आहे. तिच्या बाजूला एक टेडी बियर देखील आहे. या टेडी बियरसोबत तिने फोटो क्लिक केला आहे. या फोटोत ती खुपच सुंदर दिसत आहे. हा या अभिनेत्रीचा लहाणपणीचा फोटो आहे. ही चिमुकली आता बॉलिवूडची अभिनेत्री (Bollywood Actress)बनली आहे. या अभिनेत्रीला तुम्हाला ओळखायचे आहे.   

कोण आहे अभिनेत्री ?

फोटोत दिसणारी ही चिमुकली बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री (Bollywood Actress)आहे. या अभिनेत्रीचे वडिल देखील बॉलिवूडचे दिग्गज कलाकार आहेत. या दोघा बाप-लेकीची जोडी बॉलिवूड सिनेमांमध्ये धुमाकूळ घालत असते. अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. या अभिनेत्रीला तुम्हाला ओळखता येतेय का पाहा?

जर तुम्ही अजूनही या अभिनेत्रीला ओळखू शकला नसाल तर आम्ही तुम्हाला सांगतो, ही अभिनेत्री बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam kapoor)आहे. सोनम कपूरचा जन्म 9 जून 1985 रोजी मुंबई महाराष्ट्रात झाला. त्यांनी मुंबईतील आर्य विद्या मंदिर शाळेत शिक्षण घेतले आणि त्यानंतर मुंबई विद्यापीठ आणि पूर्व लंडन विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राजकारणात पदवी प्राप्त केली. यानंतर तिने फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले होते. 2007 मध्ये रणबीर कपूरसोबत ‘सावरिया’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

सोनम कपूरची (Sonam kapoor) गणना बॉलिवूडमधील सर्वात स्टायलिश आणि फिट अभिनेत्रींमध्ये केली जाते. पण तिच्या आयुष्यात एक वेळ अशी होती जेव्हा तिला बॉडी शेमिंगचा शिकार व्हावं लागलं होते. पण त्यानंतर सोनमने असा बदल केला की तिला पाहून कोणीही अंदाज लावू शकत नाही की तीच सोनम कपूर आहे.

सोनम कपूरने (Sonam kapoor) 8 मे 2018 रोजी दिल्लीचे प्रसिद्ध उद्योगपती आनंद आहुजा यांच्याशी लग्न केले आणि लग्नाच्या 4 वर्षानंतर 20 ऑगस्ट 2022 रोजी तिने एका मुलाला जन्म दिला, ज्याचे नाव वायु आहे.Source link

Leave a Reply