Headlines

ग्राऊंडवर तर नाहीच पण गल्ली क्रिकेटमध्येही Rohit Sharma फेल; सिक्स मारण्याच्या नादात गेली विकेट

[ad_1]

मुंबई : दक्षिण आफ्रिकेची टीम सध्या भारत दौऱ्यावर आहे. भारतात दोन्ही टीममध्ये 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी वरिष्ठ भारतीय खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीये. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमीसह अनेक खेळाडू या सिरीजचा भाग नाहीत. अशा परिस्थितीत हे खेळाडू सुट्ट्या एन्जॉय करताना दिसतायत.

काही दिवसांपूर्वी रोहित शर्मा सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मालदीवला गेला होता. यावेळी त्याने त्याच्या ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. दरम्यान आता रोहित शर्माचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

रोहितचा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल

सध्या रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये भारतीय कर्णधार रस्त्यावर क्रिकेट खेळताना दिसतोय. रोहित मुंबईच्या वरळीच्या भागात काही लोकांसोबत क्रिकेट खेळताना दिसला.

या व्हिडिओमध्ये हिटमॅन फलंदाजी करत असल्याचं पाहायला मिळतंय. गल्ली क्रिकेटमध्ये फटकेबाजी करताना कोणीतरी रोहितचा व्हिडीयो शूट केला. या व्हिडिओमध्ये रोहित खूप आनंदी दिसत होता.

रोहित शर्माने आयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये निराशाजनक कामगिरी केली. आयपीएलच्या 15 व्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सने 14 पैकी केवळ 4 सामने जिंकले. दुसरीकडे रोहित शर्माने 14 सामन्यात 19.14 च्या सरासरीने आणि 120.17 च्या स्ट्राईक रेटने 268 रन्स केले. हिटमॅनने या सिझनमध्ये एकही अर्धशतक झळकावलं नाही.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *