स्थूल शरीर, बिकीनी लूकमुळं जिची खिल्ली उडवली, तिच आमिरची लेक Ira Khan पुन्हा चर्चेत


मुंबई : अभिनेता आमिर खान (Aamir Khan)याची मुलगी आयरा अद्यापही रुपेरी पडद्यावर झळकलेली नाही. पण, तरीही तिच्या नावाच्या चर्चा आतापासूनच सुरु झाल्या आहेत. आमिर तिथं चित्रपटांच्या बाबतीत परफेक्ट असल्याचं कायमच पाहायला मिळतं. तर आयरा इथं तिच्या आयुष्याच्या बाबतीत परफेक्शनच्या शोधात असल्याचं दिसत आहे. 

काही दिवसांपूर्वीच आमिर आणि त्याची मुलगी आयरा, 25 वर्षांची झाली. यानिमित्तानं काही खास मित्र आणि कुटुंबीयांच्या हजेरीत तिनं हा खास दिवस साजरा केला. आयराच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एका पूल पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी तिनं बिकीनी लूकला पसंती दिली होती. (Ira Khan )

आयराचे हेच फोटो सोशल मीडियावर काहीशा संतप्त प्रतिक्रियांना चालना देऊन गेले. नैराश्य, नकारात्मकता, प्रियकर नुपूर शिखरेसोबत असणारं नातं आणि मानसिक आरोग्याच्या मुद्द्यांवर खुलेपणानं बोलणाऱ्या आयरानं यावेळी तिचं संतप्त रुप सर्वांसमोर आणलं आहे. (aamir kha ira khan)

तिनं पुन्हा एकदा काही बिकीनी फोटो शेअर करत, ‘वाढदिवसानिमित्तच्या लूकनं माझ्यावर रागवून, माझा तिरस्कार करुन उरकलं असेल… तर हे घ्या आणखी काही फोटो’ असं कॅप्शन तिनं लिहिलं. (ira khan instagram)

आयरानं यापूर्वी शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा बिकीनी लूक पाहून अनेकांनीच तिच्या स्थूल शरीराची आणि या लूकचीही खिल्ली उडवली होती. याच सर्वांना धारेवर धरत तिनं ही नवी पोस्ट केली. 

ट्रोल करणाऱ्यांना आणि त्यांच्या प्रतिक्रियांना तिनं धुडकावून लावत मनातली खदखद बाहेर काढली. 

आयरानं शेअर केलेल्या या फोटोंमध्ये अभिनेत्री फातिमा सना शेख हिचाही फोटो दिसत आहे. आयरानं शेअर केलेले हे फोटो गाजण्याचं आणखी एक कारण म्हणजे तिथं असणारी फातिमाची उपस्थिती. 

आयराशी तिची असणारी मैत्री वगैरे ठीक, पण त्यापलीकडेही तिचं आमिरच्या कुटुंबाशी असणारं नातं सध्या सर्वांच्याच नजरा वळवत आहे. आता हे नातं येत्या दिवसांमध्ये आणखी किती चर्चेत येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. Source link

Leave a Reply