barshiBreaking Newscpi

भाकप कडून कॉम्रेड शाहीर अमर शेख यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन

बार्शी – प्रतिनीधी – भारतीय कम्युनिस्ट पक्ष सोलापूर जिल्हा कौन्सील कडून कॉम्रेड अमर शेख यांच्या जयंती निमित्ताने आज दिनांक 20 ऑक्टोबर 2021 रोजी कोर्टा समोरील पुतळा पार्क येथील कॉम्रेड शाहीर अमर शेख यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून अमर शेखांच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या. सोबतच शेतकरी, कामगार वर्गासाठी पुढील काळामध्ये अमर शेखांनी आयुष्यभर जपलेल्या मार्क्सवादी विचारधारेवर चिकाटीने काम करण्याचा निश्चय करण्यात आला.

यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड प्रवीण मस्तूद, कॉम्रेड शौकत शेख, कॉम्रेड अनिरुद्ध नखाते, कॉम्रेड भारत भोसले, कॉम्रेड पवन आहिरे, कॉम्रेड बालाजी शितोळे, कॉम्रेड आनंद धोत्रे, कॉम्रेड कलावती घोळवे, कॉम्रेड निर्मला सरवदे उपस्थित होते.

Abs News Marathi

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!