Govinda Naam Mera Trailer: कॉमेडी आणि मर्डर सस्पेंस घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय विकी कौशल


Govinda Naam Mera Trailer : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. विकी हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. विकीनं आता पर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. दरम्यान, विकी गेल्या काही दिवसांपासून ‘गोविंदा नाम मेरा’ (Govinda Naam Mera) या त्याच्या आगामी चित्रपटामुळे तो चर्चेत आहे. अशातच आता ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 

‘गोविंदा नाम मेरा’च्या ट्रेलरच्या सुरुवातीला विकी आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) सोबत रोमँटिक झाल्याचे दिसते. पण विकी तेव्हा स्वप्नात असल्याचे त्याला नंतर कळते. गोविंदा नावाची भूमिका विकी साकारत आहे. हा गोविंदा एक कोरिओग्राफर आहे. कियारा ही देखील एक कोरिओग्राफर आहे जिच्या विकी स्वप्न पाहत असतो. दोघांचे Extra Marital Affair असतं. पण या सगळ्यात त्याची पत्नी बनलेली भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) आड येते. 

हेही वाचा : Power Rangers फेम अभिनेत्याचं 49 व्या वर्षी संपवलं जीवन

ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की, विकी कौशल पत्नी भूमीसोबत खूश नाही आणि त्याला घटस्फोट हवा आहे. यावर भूमीने त्याच्या 2 कोटी रुपये पोटगी म्हणून मागितले आहे. ट्रेलरमध्ये असाही ट्विस्ट आहे की विकीची गर्लफ्रेंड आणि भूमीचाही बॉयफ्रेंड आहे. पण मोठा ट्विस्ट येतो जेव्हा एक खून होतो आणि कियारा आणि विकी संशयाच्या भोवऱ्यात येतात. आता या चित्रपटात विकी आणि कियारानं खरोखरच खून केला आहे की त्यांना फ्रेम करण्यात येत आहे, हे नंतरच कळेल.

‘गोविंदा नाम मेरा’ डिस्ने प्लस हॉटस्टारवर होणार प्रदर्शित 

‘गोविंदा नाम मेरा’ 16 डिसेंबरला डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केले आहे, तर करण जोहर निर्माता आहे. ‘गोविंदा नाम मेरा’ची पटकथा ही शशांक खेतान यांनी लिहिली आहे. यापूर्वी हा चित्रपट 10 जून 2022 रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु काही कारणांमुळे तो प्रदर्शित होऊ शकला नाही. आता ‘गोविंदा नाम मेरा’ रिलीजसाठी सज्ज झाला आहे. (Govinda Naam Mera Trailer Vicky Kaushal Bhumi Pednekar Kiara Advani Releases Extra Marital Affair to comedy) 

धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेला हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, विकीची डान्सरची भूमिका आहे. चित्रपटात विकीची पत्नीशिवाय एक मैत्रीणही असणार आहे. चित्रपटात विकी घर मिळवण्यासाठी सतत धडपड करताना दिसतोय. चित्रपटाच्या नावावरून हा अभिनेता गोविंदाची बायोपिक (Govinda’s Biopic) आहे असे अनेकांना वाटतं. करण जोहरनं (Karan Johar) नुकताच एक व्हिडीओ शेअर करत ही गोविंदावर (Govinda) असलेली बायोपिक नसून एका डान्सरनं केलेल्या स्ट्रगलची आहे. दरम्यान, विकीसोबत भूमि पेडणेकरनं ‘भूत पार्ट वन: द हॉन्टेड शिप’ मध्ये काम केलं आहे. कियारासोबत विकीनं ‘लस्ट स्टोरीज’ मध्ये काम केलं आहे. Source link

Leave a Reply