आरोग्यभरती बाबत परीक्षार्थींना महाराष्ट्र सरकारचे आवाहन

राज्यात होत असलेल्या आरोग्य भरती बाबत महाराष्ट्र सरकारच्या वतीने एका परिपत्रकाद्वारे परीक्षर्थीना जाहीर आवाहन करण्यात आले आहे. ते आवाहन पुढील प्रमाणे

राज्यातील रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत रिक्त असलेल्या पदांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरीता गट-क संवर्गासाठी दिनांक ०५ ऑगस्ट, २०२१ व गट-ड संवर्गासाठी दिनांक ०७ ऑगस्ट, २०२१ रोजी जाहिरात देण्यात आलेली आहे. जाहिरातीनुसार अनुक्रमे गट-क करिता दिनांक २४ ऑक्टोबर, २०२१ व गट-ड करिता दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२१ रोजी लेखी परिक्षा घेण्यात येणार आहे.

सदर परिक्षा शासन स्तरावरुन निश्चित केलेल्या धोरणानुसार बाहय स्त्रोत पध्दतीने करण्यात येत आहे. परीक्षेकरीता असलेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी संगणक प्रणालीव्दारे निश्चित केलेल्या प्रक्रियेव्दारे केली जाणार आहे. आपल्या प्रवेशपत्रावर आपला फोटो चिटकून घ्यावा. फोटो असलेले पॅन कार्ड, पासपोर्ट, वाहन चालवण्याचा परवाना, मतदार ओळखपत्र, फोटोसह राष्ट्रीयकृत बँक पासबुक, मुळ आधारकार्ड मुळ ओळखपत्र पुरावा म्हणुन सोबत आणणे आवश्यक आहे. आपल्या बरोबर काळा/निळा बॉल पेन आणणे आवश्यक आहे. परिक्षेच्या वेळी मुखपट वापरणे बंधककारक आहे. प्रवेशपत्रावर नमुद केलेल्या वेळेपूर्वी किमान एक तास आधी परिक्षेच्या ठिकाणी उपस्थित राहाणे परिक्षार्थीस अनिवार्य आहे.

सदर परिक्षेच्या अनुषंगाने आपणास कोणत्याही गैर प्रकाराची माहिती असल्यास अथवा गैर प्रकार होत असल्याचे आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ ०२० २६१२२२५६ या क्रमांकावर सकाळी ०९.४५ ते सायंकाळी ०६.१५ वाजेपर्यंत संपर्क साधून माहिती द्यावी आणि जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात यावी. तसेच याबाबत arogyabharti२०२१@gmail.com या ईमेल आयडी वर माहिती पाठवावी.

सर्व उमेदवारांना आवाहन करण्यात येते की, आपण कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता तसेच कोणताही गैरप्रकार न करता प्रामाणिकपणे अभ्यास करुन परिक्षेस उपस्थित रहावे. तसेच परिक्षेसंदर्भात कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता विभागा मार्फत वेळोवेळी संकेतस्थळावर देण्यात येणा-या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सर्व परिक्षार्थींना करण्या येत आहे.

Leave a Reply