गुगलवर ‘कॉर्ल गर्ल’ला शोधणाऱ्या मुलाची ‘मासूम’ कहाणी…


मुंबई : इंटरनेट ही अशी गोष्ट आहे. जिथे आपल्याला आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतात. अगदी हेल्थपासून ते कोणत्याही गोष्टीची माहिती आपल्याला तेथे मिळते. परंतु हे लक्षात घ्या की, इंटरनेटवर असलेल्या सगळ्याच गोष्टी खऱ्या नसतात. त्यामुळे तुम्ही कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यापूर्वी निट विचार करा. या गोष्टीचा अनुभव एका मुलाला सुद्ध आला आहे. ज्यामुळे त्याला चार लोकांचा मार तर खावा लागला तसेच, त्याचे पैसे देखील गेले.

या तरुणाने इंटरनेटवर कॉर्ल गर्लचा नंबर शोधला आणि तिला भेटायला गेला. मात्र तिथे जो प्रकार घडला, तो त्याला भलताच महागात पडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३४ वर्षीय तरुण पश्चिम विहारमध्ये कुटुंबासोबत राहतो. तो सॅनिटायझरचा व्यवसाय करतो. दुपारी एकच्या सुमारास तो ऑनलाइन कॉल गर्ल्स शोधत होता.  त्याला इंटरनेटवर मोबाईल नंबर मिळाला आणि त्याचे एका मुलीशी बोललो.

त्यानंतर या तरुणीने या मुलाला व्हिडीओ कॉलद्वारे रोहिणी सेक्टर-22 मध्ये भेटण्यासाठी बोलावले.

तरुण भेटायला गेला आणि…
दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तरुण तेथे पोहोचला. तरुणीने तेथून प्रेमनगरच्या दिशेने येण्यास सांगितले. तो तरुण त्या ठिकाणी पोहोचला. यानंतर मुलगी म्हणाली की पीर बाबाच्या ठिकाणी थांब. सुमारे 5 मिनिटांनी तरुणी आली आणि तरुणाच्या दुचाकीवर बसून तिला पॉकेट-13 समोर आणले.

येथे या तरुणाला एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये नेण्यात आले. तरुणीने व्हॉट्सअॅपवर कोणालातरी कॉल केला.

काही वेळाने एक मुलगी आणि आणखी दोन पुरुष तिथे आले. चौघांनी त्या तरुणाला मारण्यास सुरुवात केली आणि त्याच्या पर्समधील तीन हजार रुपये काढून घेतले. तसेच या तरुणाला धमकी दिली आणि सांगितले की, तुला तुझा जीव वाचवायचा असेल, तर आमच्या खात्यात 50 हजार रुपये ट्रान्सफर कर.

परंतु त्याच्याकडे 50 हजार नव्हते, म्हणून त्याने आपल्या वडिलांना कॉल करुन पैसे द्यायला सांगितेल. तेव्हा त्याच्या वडिलांकडे देखील 30 हजारच होतो. त्यांनी ते या लोकांनी दिलेल्या अकाउंटवरती ते ट्रांसफर केले.

पैसे मिळाल्यानंतर या चौघांनी तरुणाला रुमच्या बाहेर हकलूव दिले. या घटनेनंतर या तरुणाने पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिस या टोळीचा शोध घेत आहेत.Source link

Leave a Reply