Google Search रिझल्टमध्ये तुमची वैयक्तिक माहिती दिसतेय ? ‘असे’ करा डिटेल्स रिमूव्ह ,पाहा टिप्स


नवी दिल्ली:Remove Personal Details: आजच्या या सोशल मीडियाच्या काळात आपल्या गोपनीयतेचे संरक्षण करणे हे एक मोठे आव्हान बनले आहे. बरेच जण फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर सारख्या सोशल मीडियावर नाव, फोन नंबर, पत्ता आणि ईमेल पत्ता इत्यादी माहिती शेअर करतात. या मोठ्या वेबसाइट्स असल्या आणि त्यांचे गोपनीयता धोरण मजबूत असलं तरी देखील अशा अनेक वेबसाइट्स आहेत आपल्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करत नाहीत. जेव्हा हे तपशील Google वर दिसू लागतात तेव्हा युजर्ससमोर सर्वात मोठी निर्माण होते. म्हणूनच Google सर्च रिझल्ट्समधून ही वैयक्तिक माहिती कशी काढायची याबद्दल आज आम्ही सविस्तर सांगणार आहो.

वाचा: मस्तच ! Samsung Galaxy A Series च्या स्मार्टफोन्सची किंमत झाली कमी, ऑफर्स आणि फीचर्स पाहा

Google ने नुकतीच युजर्ससाठी ‘Results About You’ ही सुविधा सुरू केली असून हे फीचर Google वरून युजर्सची वैयक्तिक माहिती काढून टाकण्यासाठी तयार करण्यात आले आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती स्वतः हटवू शकता. यासाठी तुम्हाला Google सपोर्ट पेजवर जावे लागेल. त्यानंतर सर्च रिझल्टमधून तुम्हाला जी URL काढायची आहे त्याचा उल्लेख करणारा फॉर्म भरा. तुम्ही या फॉर्ममध्ये एकाच वेळी अनेक URL देखील जोडू शकता. यानंतर Google या पेजेसची पडताळणी करेल. जर तुम्ही दिलेली माहिती बरोबर असेल तर ती बंद केली जाईल. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या प्रक्रियेला थोडा वेळ लागू शकतो.

वाचा: Earphones Deals: नवीन वायरलेस इयरफोन्स खरेदी करायचे असल्यास ‘ही’ लिस्ट एकदा पाहाच

वेबसाइटवरून माहिती हटवा:

वैयक्तिक माहिती हटविण्याचा दुसरा मार्ग म्हणजे त्या पेजवर थेट भेट देऊन माहिती हटविण्याची विनंती करणे. यासाठी तुम्हाला URL च्या शेजारी असलेल्या तीन डॉटवर क्लिक करावे लागेल आणि नंतर About this result पेजवर जावे लागेल. येथून रिमूव्ह रिझल्ट या पर्यायावर क्लिक करा. यानंतर पेज काढण्याची प्रक्रिया सुरू होईल.

रिक्वेस्ट ट्रॅक करा:

या दोन्ही प्रक्रियेनंतर तुम्ही तुमच्या विनंतीचा मागोवा घेऊ शकता. यासाठी तुम्हाला Google App वर जाऊन रिझल्ट्स अबाऊट यू वर जावे लागेल. तुमच्या प्रोफाईल फोटोवर क्लिक करताच तुम्हाला रिक्वेस्टचे स्टेटस पाहता येईल. इतकंच नाही तर इथे रिक्वेस्ट स्टेटस पाहण्यासोबतच तुम्ही नवीन रिमूव्ह रिक्वेस्ट देखील जोडू शकता.

वाचा: स्वस्तात iPhone खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! Apple चा दिवाळी सेल सुरू, मिळतोय मोठा डिस्काउंट

Source link

Leave a Reply