Headlines

शुभ कार्यात फक्त आंब्याच्या झाडाचीच पानं का वापरतात; तुम्हाला माहितीये का कारण?

[ad_1]

मुंबई : आंबा हा फळांचा राजा मानला जातो, तर त्याचा झाडांची पानं पूजेसाठी (Mango leaves) वापरली जातात. घरात हवन असो किंवा पूजा असो, आंब्याची डहाळी आणि पानांशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही. शेवटी, आंब्याच्या पानांमध्ये काय विशेष आहे की ते नेहमी हवन-पूजेत वापरले जातात. दुसर्‍या झाडाच्या पानांचा विचारही केला जात नाही. हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच अनेक वेळा रेंगाळत असेल. आज आम्ही तुम्हाला याचं आज तुम्हाला सविस्तर उत्तर मिळणार आहे.

सनातन धर्मशास्त्रानुसार आंब्याचं झाड मेष राशीचे प्रतीक मानले जाते. असे म्हटले जाते की मेष राशीसाठी आंब्याचे झाड सर्वात शुभ असते. ज्या घरात आंब्याचे झाड असते, त्या घरावर नेहमी देवी-देवतांच्या आशीर्वादांचा वर्षाव होतो. यामुळेच घर, दुकान किंवा इतर कोणत्याही ठिकाणी केलेल्या कामात आंब्याची पाने नेहमी वापरली जातात. दुकानाच्या दारावर हार घालायचा असो किंवा पूजेत वापरायचा असो, नेहमी आंब्याची पानेच मागवली जातात.

आणखी वाचा : शाहिद कपूरचं आलिशान घर, या luxury duplex ची किंमत ऐकून बसेल धक्का

जेव्हा जेव्हा कलश यात्रा काढली जाते तेव्हा ती आंब्याच्या पानांशिवाय पूर्ण होत नाही. कलशावर नारळ ठेवण्यापूर्वी त्यात आंब्याची पाने ठेवतात. त्यानंतर नारळ ठेवून कलश पकडतात. कलश यात्रेनंतर पाणी अर्पण केल्यावर त्यावर ठेवलेली आंब्याची पानं देवांच्या मूर्तीसमोर अर्पण केली जातात.

आणखी वाचा : विवाहित असूनही अभिनेत्रीं दुसऱ्या पुरुषावर भाळल्या….; यादीतलं चौथं नाव धक्कादायक

आंब्याची पानं अतिशय शुभ आणि पवित्र मानली जातात. यामुळेच घरातील प्रत्येक पूजेत मंत्रजप करताना आंब्याच्या पानांनी आचमन क्रिया केली जाते, असे केल्याने प्राणिमात्रात अलौकिक शक्तींचा प्रवाह वाढतो आणि मनुष्याला स्वतःच्या अंतरंगात देव अनुभवता येतो, असे मानले जाते.

आणखी वाचा : 50 व्या वाढदिवसाच्या दिवशी न्यूड झाली ही अभिनेत्री, बोटॉक्स विषयी केला धक्कादायक खुलासा

सनातन धर्मात येणारे सर्व प्रमुख सण आणि शुभ प्रसंगी घराच्या मुख्य दारावर आंब्याच्या पानांचे तोरण बांधण्याची प्रथा आहे. असे म्हटले जाते की असे केल्याने नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाही आणि कुटुंबात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो.

आणखी वाचा : कलाकारांकडूनही घडलीये घर फोडण्याची चूक; काही नावं वाचून धक्काच बसेल

घरातील हवन-यज्ञात नैवेद्य दाखवण्यासाठी आंब्याच्या झाडाचे लाकूड नेहमी वापरले जाते. तसेच लग्नाचा मंडप सजवण्यासाठी आंब्याच्या पानांचा वापर केला जातो. त्यामागे आंब्याचे झाड शुभ मानले जाते.

आणखी वाचा : लग्न न करताच अभिनेता झाला बाबा; पत्नीला सोडून Girlfriend सोबत जगतोय मनमुराद आयुष्य

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *