घटस्फोटानंतर समंथाकडे Good News; ऐकणारेही चक्रावले


मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दमदार कामगिरी करणारी अभिनेत्री समंथा रुथ प्रभू गेल्या काही काळापासून तिच्या खासगी आयुष्यामुळं चर्चेत आली होती. कारण होतं ते म्हणजे अभिनेता नागा चैतन्य याच्यासोबतच्या वैवाहिक नात्यात आलेला दुरावा. (samantha ruth prabhu)

समंथा आणि नागा चैतन्य यांनी लग्नाच्या 4 वर्षांनंतर त्यांच्या वैवाहिक नात्याला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर दोघांनीही आपआपल्या वेगळ्या वाटांनी आयुष्य जगण्यास सुरुवात केली. 

विभक्त आयुष्यात स्थिरावताना दोघांनीही अपेक्षित वेळ घेतला. ज्यानंतर आता म्हणे समंथा गोड बातमी देण्यासाठी सज्ज झाली आहे. फक्त सज्ज नाही, तर तिनं ही गोड बातमी दिलीही आहे. 

समंथा सध्या तिच्या कामावर लक्ष केंद्रीत करताना दिसत आहे. यादरम्यानच तिनं आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सर्वांना सांगत आनंदाची बातमी दिली आहे. 

हरी आणि हरीशा दिग्दर्शित, समंथाची मुख्य भूमिका असणारा ‘यशोदा’ चित्रपट यंदाच्याच वर्षी 12 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. मंगळवारी निर्मात्यांनी याची घोषणा केली.

तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी अशा भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. 

अॅक्शन थ्रिलर कथानक असणआऱ्या या चित्रपटामध्ये समंथा काही साहसदृश्य साकारताना दिसणार आहे. मे महिन्यापर्यंत या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

खासगी आयुष्यात मोठी वादळं झेलत आता समंथा तिच्या करिअरवर लक्ष देताना दिसत आहे. त्यामुळं आगामी चित्रपटाची तारीख जाहीर होणं ही तिच्यासाठी नक्कीच मोठी आनंदाची बाब आहे, असं म्हणायला हरकत नाही. Source link

Leave a Reply