Headlines

भलाभल्यांच्या नजरेत आला नाही झेब्रा, तुम्ही शोधून काढणार का त्याला?

[ad_1]

मुंबई : सोशल मीडियावर दररोज लाखो फोटो व्हायरल होतात. ज्यांपैकी काही फोटो खरोखरचं लोकांची मनं जिंकतात, ज्यामुळे लोक त्याला सोशल मीडियावरती आणखी शेअर करतात, ज्यामुळे हे फोटो सोशल मीडियावर ट्रेंडिंग होतात. यामधील काही फोटो खूपच मनमोहक असतात. तर काही असे फोटो असतात. जे एखाद्या मीम्स किंवा घटनेचा असतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. जो तुम्हाला वेड करुन सोडेल.

हा फोटो एका वाळवंटांमधील आहे. जेथे झेब्रा चालत जात आहेत. परंतु यामध्ये झेब्राची सावली दिसत आहे. ज्यामधून तुम्हाला खरा झेब्रा ओळखायचा आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन नेटीझन्स आपल्या मित्रांना झेब्रा शोधायला लावत आहे.

पाहा तुम्हाला देखील या फोटोमधील खरा झेब्रा शोधता येतोय काय? जर तुम्हाला हे जमलं तर तुम्ही देखील तुमच्या मित्रांमध्ये पॉप्युलर व्हाल.

हा असा फोटो आहे, ज्याला तुम्ही तासनतास बसुन शोधलात तरी देखील तुम्हाला यामध्ये झेब्रा सापडणार नाही.

तुम्हाला चित्रात खरा झेब्रा दिसला का?

इंटरनेटवर व्हायरल होत असलेला हा फोटो पाहून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल, कारण हा फोटो म्हणजे ऑप्टिकल इल्युजनचा आहे. ज्यामुळे तुम्हाला या फोटोमध्ये खरा झेब्रा पाहाता येत नाही.

काय आहे या फोटोची सत्यता

जर तुम्ही बारकाईने पाहिले तर तुम्हाला दिसेल की, काळ्या रंगाचे प्राणी हे प्रत्यक्षात प्राणीच नाही आहे. त्यामुळे तुम्ही त्या सावलीत झेब्रा शोधायला गेलात, तर तो तुम्हाला दिसणारच नाही. कारण ते सूर्यास्ताच्या वेळी जमिनीवर पडणारी प्राण्याची सावली आहे.

खरेतर हा फोटो टॉप अँगलनी काढला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खरे प्राणी एका रेषे प्रमाणे दिसत आहेत, तर तर त्यांची सावली काळी दिसत आहे. बरेच लोक त्या सावलीत झेब्रा शोधण्याची चुक करतात. म्हणून त्यांची दिशा भूल होते. परंतु तुम्ही या सावलीच्या खालच्या बाजूला पाहा, जेथे तुम्हाला जाळी सारखं काहीतरी दिसतं, तेच खरे झेब्रा आहेत.

हा फोटो प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार बेवर्ली जौबर्टने काढला आहे. हा फोटो त्याने 2018 मध्ये त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. या फोटोला आतापर्यंत 13 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. तर अजूनही अनेक लोकांना यामागचं उत्तर मिळालेलं नाही.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *