गोंडस दिसणारा हा बाळ, आजही अनेक तरुणींच्या मनात घर करुन बसलाय… सांगा कोण आहे तो अभिनेता?


मुंबई : अनेक वेळा स्टार्सचे असे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात, ज्यामध्ये त्यांना ओळखणं देखील कठीण होतं. आता अशाच एका स्टार्सचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये या त्याला ओळखणं कोणालाही शक्य होत नाहीय. खरंतर हा फोटो या स्टारच्या लहानपणीचा फोटो आहे, ज्यामुळे त्याला ओळखणं तसं कठीण आहे. परंतु तुम्ही तरीही तुमची युक्ती वापरुन त्याला ओळखण्याचा प्रयत्न करु शकता.

हा फोटो अशा स्टारचा आहे, जो अवघ्या काही वर्षांत, बॉलिवूडमध्ये इतका मोठा अभिनेता बनला आहे, की या अभिनेत्याला बॉलिवूडमधील खानांइतकीच फी मिळत आहे. पाहा तुम्ही या अभिनेत्याला ओळखू शकता का?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये हा गोंडस लहान मूलगा फ्रीजमध्ये बसलेला दिसत आहे. हा अभिनेता बालपणी किती खोडकर होता, त्याचा हा फोटो साक्षीदार आहे. फाटोत हे गोंडस बाळ फ्रीजमध्ये अशा प्रकारे बसले आहे की, हे पाहून कोणालाही या गोंडस बाळावर प्रेमाचा वर्षाव झाल्यासारखे वाटेल.

तुम्ही त्याला ओळखलं का?

या गोंडस मुलाचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तुम्हा या फोटोमधील अभिनेता ओळखता आला नसेल, तरी काळजी करु नका. आम्ही तुम्हाला त्याला ओळखण्यासाठी मदत करणार आहोत.

खरंतर फ्रीजमध्ये बसलेला हा निरागस मुलगा दुसरा कोणी नसून तो विकी कौशल आहे. विकी कौशलने अवघ्या काही वर्षात आपल्या अभिनयाने लोकांमध्ये असं स्थान निर्माण केले आहे की, आज त्याचं नाव बॉलिवूडमधील मोठ्या कलाकारांच्या यादीत घेतलं जातं.

या चित्रपटांमध्ये दिसले

विक्की कौशलने ‘मसान’ या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटातून या अभिनेत्याला प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटानंतर विकीने मागे वळून पाहिलेच नाही. याशिवाय विकी कौशल ‘सरदार उधम’, ‘राझी’ आणि ‘संजू’मध्ये दिसला आहे.Source link

Leave a Reply