Headlines

करिअरच्या शिखरावर अभिनेत्यानं का घेतला आश्रमात टॉयलेट साफ करण्याचा निर्णय?

[ad_1]

मुंबई : आज म्हणजेच 6 ऑक्टोबरला बॉलिवूड अभिनेते विनोद खन्ना (Vinod Khanna)  यांचा वाढदिवस आहे. ते या जगात नसले तरी त्यांचे सुपरहिट चित्रपट आजही प्रेक्षकांना भुरळ घालतात. विनोद खन्ना यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. हे एक असे अभिनेते आहेत ज्यांनी1970 आणि 1980 च्या दशकात प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवलं आमि ते बॉलिवूडमधील लोकप्रिय स्टार्स पैकी एक ठरले. जेव्हा ते त्यांच्या करिअरच्या शिखरावर होते, तेव्हा विनोद खन्ना यांनी करिअर सोडलं आणि संन्सासी जीवन निवडलं. 

विनोद खन्ना यांनी बॉलिवूड सोडलं आणि ते अध्यात्मिक गुरू ओशो रजनीश (Osho ashram) यांचे अनुयायी झाले. त्यांनी पुण्यातील ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्ट (Osho ashram) ला भेट दिली, 1982 मध्ये ते त्यांच्या गुरूसोबत राहण्यासाठी अमेरिकेतील ओरेगॉनमधील रजनीशपुरम येथे गेले.

बातमीची लिंक : ‘विमानात केली मारहाण, मुलाचाही दाबला गळा…,’ ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीनं केले धक्कादायक आरोप

डिसेंबर 1975 मध्ये विनोद खन्ना यांनी चित्रपट सोडून संन्यासी बनण्याचा निर्णय घेतला तेव्हा बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली होती. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अनेक चित्रपट निर्मात्यांना धक्का बसला. त्या काळात त्यांना ‘सेक्सी संन्यासी’ असेही संबोधले जात होते.

आणखी वाचा : ‘बुरखा, हिजाब, लव्ह जिहाद…’, रिचा चढ्ढा आणि अली फजलच्या लग्नानंतर नेटकऱ्यांनी दिल्या विचित्री शुभेच्छा!

एका मुलाखतीत विनोद खन्ना यांनी सांगितले की ‘ओशोच्या शब्दांनी त्यांना एका शाश्वत सत्याची ओळख करून दिली: मृत्यू.’ ओशोंनी त्यांचे नाव स्वामी विनोद भारती ठेवले. ते रजनीशपुरममध्ये ( Rajneeshpuram) माळी म्हणून काम करायचे. बागेची देखभाल, रोपांची काळजी, त्यांना पाणी देणे, रोपांची छाटणी करणे, लागवड करणे. यादरम्यान ते टॉयलेटही साफ करत असे. (osho ashram to call vinod khanna in the a sexy sannyasin clean saint rajneesh toilet too) 

आणखी वाचा : एक दोन नाही तर, 17 मिनिटं चालला राम कपूर- साक्षी तंवर यांचा इंटीमेट सीन, प्रेक्षकांकडून संताप व्यक्त

वर्षानुवर्षे मूत्राशयाच्या कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर, विनोद खन्ना यांनी 27 एप्रिल 2017 रोजी या जगाचा निरोप घेतला. यापूर्वी अनेक वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. जर्मनीत त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली, तरीही त्यांचे निदान झाले नाही. पाकिस्तानातील पेशावर येथील त्यांच्या वडिलोपार्जित घराला भेट द्यायची अशी त्यांची इच्छा होती, परंतु त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.आपल्या प्रदीर्घ बॉलिवूड कारकिर्दीत, त्यांनी 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले, आणि एक सक्रिय राजकारणी आणि ते गुरुदासपूर, पंजाबचे खासदार होते.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *