घटस्फोटोनंतर सैफ अली खान का म्हणाला, मी शाहरुख खान नाही’….


मुंबई :  सैफ अली खान आणि करीना कपूर अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. दोघांनी 2012 मध्ये लग्न केलं. विशेष म्हणजे करीना कपूर ही सैफ अली खानची दुसरी पत्नी आहे तर, अमृता सिंग ही त्याची पहिली पत्नी आहे.

सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग 1991 मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले. त्याचबरोबर, लग्नाच्या 13 वर्षानंतर दोघांनीही एकमेकांपासून घटस्फोट घेतला. मात्र, घटस्फोटानंतर सैफ अली खानने मुलाखतीत अमृता सिंगबद्दल बरंच काही सांगितलं होतं.

मी शाहरुख खान नाही-सैफ अली खान 
घटस्फोटानंतर सैफ अली खानला अमृता सिंगला 5 कोटी रुपये पोटगी दिली आणि मुलगा इब्राहिम 18 वर्षांचा होईपर्यंत प्रत्येक महिन्याला एक लाख रुपये द्यावे लागले.

सैफ अली खानने 2005 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत याबद्दल बोलताना सांगितलं होतं की  ‘मी अमृताला 5 कोटी रुपये देणार आहे. त्यापैकी मी तिला आधीच 2.5 कोटी रुपये दिले आहेत. यासोबतच माझा मुलगा १८ वर्षांचा होईपर्यंत मी दरमहा १ लाख रुपये देत आहे. मी शाहरुख खान नाही, माझ्याकडे इतके पैसे नाहीत. मी तिला वचन दिलं आहे की,  बाकीचे पैसेही मी देईन आणि काहीही झाले तरी मी देईन. अभिनेता पुढे म्हणाला की मी जाहिराती, स्टेज शो आणि चित्रपटांमधून जे पैसे कमावतो ते माझ्या मुलांना देत आहे, माझ्याकडे जास्त पैसे नाहीत.

त्याचवेळी सैफने असंही सांगितलं होतं की, तो त्याच्या दोन्ही मुलांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खानला खूप मिस करतो, पण अमृता त्यांना मला भेटू देत नाही.  आणि त्याची मुलंही त्याला भेटायला येऊ शकत नाहीत.Source link

Leave a Reply