Headlines

घरातील इलेक्ट्रिक डिव्हाइसेसची ‘अशी’ काळजी घेतली तर, Electrical Accidents टाळणे शक्य, पाहा टिप्स

[ad_1]

नवी दिल्ली: उन्हाळा आला की विजेचा वापर अनेक पटींनी वाढतो. सगळीकडे Ac, पंखे, Coolers यांसारखी इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस वापरायला सुरुवात होते. आता घरून काम करण्याचा ट्रेंड वाढला असल्यामुळे लॅपटॉप, मोबाईल, टेलिव्हिजन या डिव्हाइसेसचा वापरही घरात वाढला आहे. विजेचा वापर वाढल्याने Electric Accidents चा धोकाही वाढू शकतो. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार, देशात दरवर्षी किमान ३,००० लोक विजेशी संबंधित अपघातात मृत्युमुखी पडतात. ही आकडेवारी या हंगामातील आहे. म्हणूनच आज आम्ही काही सोप्प्या तुमच्यासोबत शेयर करणार आहो. ज्या तुम्हाला सुरक्षित राहण्यात मदत करतील.

वाचा: Realme GT 2 Pro भारतात लाँच, मिळणार ५० + ५० मेगापिक्सलचा भन्नाट कॅमेरा, सोबत 2K सुपर रियॅलिटी डिस्प्ले, पाहा किंमत

RCCB किंवा ELCB :

RCCBs किंवा ELCBs घरातील सर्वात दुर्लक्षित डिव्हाइसेसपैकी एक आहेत. लीक झाल्यास, ते एका सेकंदाच्या सर्किट तोडू शकते आणि आणि विद्युत शॉक टाळू शकते. परंतु, तरीही जवळ- जवळ ९० % घरांमध्ये ते नाहीत. RCCB किंवा ELCB आवश्यक करण्यासाठी अनेक राज्य सरकारे/डिस्कॉम्सनी योग्य पावले उचलली आहेत. अशा परिस्थितीत, घरांसाठी ते खूप महत्वाचे आहे.

सर्ज प्रोटेक्शन डिव्हाइसेस:

ही डिव्हाइसेस तुमच्या महागड्या घरातील डिव्हाइसेसचे संरक्षण करतात. ICA-India च्या आकडेवारीनुसार, जुने इलेक्ट्रिक लेआउट असलेल्या इमारतींमध्ये सुमारे ३५ % शॉर्ट सर्किट आणि आगीच्या घटना घडतात. सर्ज प्रोटेक्शन नसल्यास वारंवार व्होल्टेज वाढल्याने एका सेकंदात घरातील प्रत्येक Electric Device चे मोठे नुकसान होऊ शकते. सर्ज प्रोटेक्शन डिव्हाइसेस ट्रांसिएंट व्होल्टेज ब्लॉक करतात.

करंट ओव्हरलोड :

आजकाल घरातील प्रत्येक डिव्हाइस विजेवर काम करते. ज्यामुळे करंट ओव्हरलोडिंग होऊ शकतो. घरातील वेगवेगळ्या उपकरणांना स्विचगियरचे योग्य कॉम्बीनेशन आवश्यक आहे. जे, सर्किट वेगळे करू शकतात आणि इलेक्ट्रिकल उपकरणांचे संरक्षण करू शकतात. हे सर्किट ब्रेकर वेगवेगळ्या प्रकारच्या लोड्ससाठी वेगवेगळ्या रेटिंगमध्ये येतात आणि त्यामुळे योग्य लोडसाठी योग्य दर्जाचा, योग्य कंपनी ब्रेकर आवश्यक असतो.

वायरची क्वालिटी:

योग्य रेटिंग आणि योग्य गुणवत्ता पाहूनच वायर खरेदी करावे. १३ टक्के अपघात आग शॉर्ट सर्किट आणि खराब वायरिंगमुळे होतात . एखादे घर २० वर्षांहून अधिक जुने असेल, तर त्यातील तारांमध्ये आजच्या सरासरी घरानुसारही Electric Devices हाताळण्याची ताकद नसते. मात्र, आता विजेच्या प्रवाहातील बदल त्वरीत ओळखून अपघात टाळण्यासाठी त्यावर नियंत्रण ठेवणारी विद्युत वायरिंग डिव्हाइस आहेत.

वाचा: झटका! ‘या’ Samsung स्मार्टफोन्सना कधीच मिळणार नाही सॉफ्टवेयर अपडेट, तुम्ही तर नाही वापरत हे फोन्स ?

वाचा: आता तुमच्याही घरी असेल स्मार्ट टीव्ही, खूपच स्वस्तात मिळताहेत हे भन्नाट Smart LED TV पाहा डिटेल्स

वाचा: ‘या’ कारणांमुळे होतो स्मार्टफोनमध्ये ब्लास्ट, उन्हाळयात अशी ‘घ्या’ स्मार्टफोनची काळजी, पाहा या टिप्स

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *