घरात कावळे येणे शुभ की अशुभ? शकुन शास्त्रात लपलेयत यामागील संकेत


मुंबई : आपण बाहेर नेहमीच कावळ्यांना पाहातो. परंतु कावळ्यांसंबंधीत काही शुभ आणि अशुभ मान्यता आहेत, ज्या आपल्यापैकी बरेच लोक पाळतात. परंतु अनेकांना याबद्दल संपूर्ण माहिती नसते, ज्यामुळे या मान्यतांबद्दल त्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थीत होतात. आज आम्ही तुम्हाला कावळ्यासंबंधीत रहस्य आणि त्याचे शुभ-अशुभ संकेत सांगत आहोत. हे जाणून घेतल्यावर कावळ्यांबद्दलचे तुमचे मत पूर्णपणे बदलेल.

शकुन शास्त्रानुसार घराच्या छतावर कावळ्यांचे आगमन शुभ मानले जाते. असे मानले जाते की, निसर्गाने कावळ्यांना भविष्य पाहण्याची अद्भुत शक्ती दिली आहे. म्हणूनच तो येणार्‍या वेळेचा अगोदरच अंदाज घेतो आणि तुम्हाला त्याबद्दल सावध करण्यासाठी घरी पोहोचतो.

आता कावळा आपल्याला कोण कोणत्या पद्धतीने संकेत देतो? हे जाणून घेऊ या

शकुन शास्त्रानुसार भांड्यात कावळा पाणी पिताना दिसला तर, ते खूप शुभ मानले जाते. याचा अर्थ असा की, नजीकच्या भविष्यात तुम्हाला पैसा मिळणार आहे किंवा तुम्हाला एखाद्या कामात मोठे यश मिळणार आहे.

शिवाय तुम्ही कावळ्यांचा कळप घरांच्या छतावर येऊन आवाज करत किंवा आपापसात भांडत असल्याचे दृश्य तुम्ही अनेकदा पाहिले असेल. शकुन शास्त्रानुसार असे करणे अशुभ मानले जाते. याचा अर्थ त्या घराच्या मालकाला लवकरच अडचणीचा सामना करावा लागणार आहे. ती व्यक्ती एकतर आर्थिक संकटात बुडणार आहे किंवा घरात कलह निर्माण होणार आहे.

असे मानले जाते की, जर सकाळी उडणारा कावळा आला आणि कोणाच्या पायाला स्पर्श केला तर ते खूप शुभ मानले जाते. म्हणजे समाजात त्या व्यक्तीची प्रतिष्ठा वाढणार आहे. यासोबतच त्या व्यक्तीचे कोणतेही राहिलेलं किंवा अडकलेलं कामही पूर्ण होणार आहे.

जर कावळा तोंडात अन्नाचा तुकडा किंवा भाकरीचा तुकडा घेऊन बसलेला किंवा उडताना दिसला, तर ते देखील चांगले मानले जाते. शकुन शास्त्रानुसार या अवस्थेत कावळे दिसणे हे लक्षण आहे की, तुमची मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.

जर कावळा घराच्या मुख्य गेटवर येऊन ओरडत असेल, तर तुमच्या घरी पाहुणे येणार असल्याची चिन्हे आहेत. ज्याची माहिती कावळा तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. हे माँ लक्ष्मीच्या आगमनाचे म्हणजे घरात संपत्तीचे प्रतीक आहे.Source link

Leave a Reply