Headlines

घरात बसून WhatsApp वर मागवा फळं, भाज्या आणि किराणा, फक्त या नंबरवर करा HI

[ad_1]

नवी दिल्लीः meta and jio platforms collaborate : मेटा आणि जिओ प्लॅटफॉर्मने व्हॉट्सॲपवर JioMart सोबत एन्ड टू एन्ड शॉपिंग एक्सपीरियन्स आणण्यासाठी पार्टनरशीप केली आहे. ग्राहक आता या ॲपद्वारे ग्रोसरी कॅटलॉग वरून वस्तूची निवड करू शकतील. तसेच व्हॉट्सॲप चॅट सोडून JioMart वर पेमेंट सुद्धा करू शकतील. जर तुम्हाला जिओच्या या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तो घेऊ शकता. या ठिकाणी आम्ही स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रोसेस सांगत आहोत, जाणून घ्या डिटेल्स.

WhatsApp वरून JioMart वर खरेदीसाठी या स्टेप्सला फॉलो करा

स्टेप १ : सर्वात आधी WhatsApp ओपन करा आमि JioMart नंबर 7977079770 वर “Hi” पाठवा.

स्टेप २ : आता तुम्हाला “Get Started” ऑप्शन सोबत एक शुभेच्छा संदेश दिसेल.

स्टेप ३ : आता “View Catalogue” वर टॅप करा.

स्टेप ४ : आता आपला Pin Code टाका.

स्टेप ५ : आता तुम्ही आपल्या आवडते फळ, भाजीपाला, पेय पदार्थ, पर्सनल केयर, आणि अन्य प्रोडक्ट पाहू शकतात.

स्टेप ६ : आता कार्ट मध्ये आपल्या पसंतीच्या वस्तू जोडण्यासाठी “+” आयकॉनवर टॅप करा.

स्टेप ७ : एकदा प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही वर दिलेल्या उजव्या बाजुच्या कोपऱ्यातील कार्ट आयकॉनवर टॅप करून कार्ट मध्ये जावू शकता किंवा स्क्रीनच्या खाली “View Cart” ऑप्शनवर टॅप करू शकता.

स्टेप ८ : संकेत मिळाल्यानंतर आता तुम्ही आपला पत्ता देवू शकता. पेमेंट मोड निवडू शकता. जसे कॅश ऑन डिलिव्हरी, पे ऑन जिओ मार्ट, पे ऑन व्हॉट्सॲप यासारखे.

वाचाः Aadhar Card सोबत कॅरी करण्याची नाही गरज, फोनमध्येच ‘असे’ करा डाउनलोड, फॉलो करा ही प्रोसेस

आता पेमेंट करू शकता. तुमचे सामान तुमच्या पत्तावर पोहोचले जाईल.

वाचाः Jio लाँच करणार जगातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, पाहा काय असेल खास

वाचाः स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास थोडं थांबा, सप्टेंबरमध्ये iphone 14सह धुमाकूळ घालायला येताहेत हे फोन्स

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *