
सोलापुर :- मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 68(2) मधील तरतूदीनुसार शासनाने दिनांक 16 ऑगस्ट 2014 रोजी जारी केलेल्या अधिसुचनेद्वारे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणे गठीत करण्यात आली आहेत. अप्पर परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे निर्देशानुसार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण सोलापूर करिता एका अशासकीय सदस्याची नियुक्ती करावयाची आहे.
अशासकीय सदस्याची नियुक्ती ही मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 68(2) मधील तरतूदीच्या अधीन राहून जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील प्रादेशिक परिवहन प्राधिकरण सोलापूर यांचेकडून करण्यात येणार आहे.
- एआर रहमान यांनी आयोजित केलं कीर्तन! दुबईतल्या घरात ‘हरे राम, हरे कृष्ण’चा जयघोष
- रणबीर कपूरसह न्यूड सीन देणाऱ्या तृप्ती डिमरीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल; म्हणाली ‘वडिलांनी मला…’
- ट्विंकल खन्नाचं धक्कादायक ट्वीट म्हणाली, ‘जगण्याची फक्त…’
- हिंदी-मराठी नव्हे, ‘या’ भाषेच्या चित्रपटात काम करण्यासाठी नाना पाटेकर उत्सुक
- Animal चित्रपटाने मिटवली बाप-लेकाची नाराजी, Video वर आल्या भन्नाट प्रतिक्रिया
अशी व्यक्ती जी कोणत्याही परिवहन उपक्रमात मालक किंवा कर्मचारी म्हणून किंवा अन्यथा कोणतीही आर्थिक हितसंबंधी असेल, अशी कोणतीही व्यक्ती प्रादेशिक परिवहनाचा प्राधिकरणाचा सदस्य म्हणून नियुक्त करण्यात येणार नाही किंवा तिचे सदस्यत्व चालू राहणार नाही आणि अशा कोणत्याही प्राधिकरणाचा सदस्य असलेल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही परिवहन उपक्रमामध्ये आर्थिक हितसंबंध संपादित केल्यास, अशा तारखेपासून चार आठवडयांच्या आत, असा हितसंबंध संपादित केला असल्याची लेखी नोटीस राज्य शासनास देऊन ते पद रद्द करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
सोलापूर शहर/जिल्ह्यातील इच्छुक अर्जदारांनी शुक्रवार, दिनांक 22 जुलै 2022 पर्यंत सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर यांचेकडे स्वतः अर्ज सादर करावेत. या तारखेनंतर येणाऱ्या ” अर्जाचा विचार प्राधिकरणाकडून केला जाणार नाही, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तथा सचिव प्रादेशिक परिवहन प्राधिकरण सोलापुर यांनी कळविले आहे.