गे आहेस म्हणून असं होतंय…, लैंगिक शोषण झालेल्या सेलिब्रिटीच्या वेदना जगासमोर


मुंबई : लैंगिक शोषणामुळं आपल्या जीवनात मोठे आघात झाल्याचं म्हणत मनात दाटलेल्या असंख्य भावना एका सेलिब्रिटीनं नुकत्याच जगासमोर आणल्या. पुरोगामी विचारांची आम्ही कास धरली असं म्हणणाऱ्यांपैकीच कित्येकांनी तिचं जगणं कठीण केलं होतं. 

एखाद्याचा शारीरिक छळ होणं थट्टा, मजा- मस्तीचा विषय कसा असू शकतो हेच या सेलिब्रिटीनं तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला तेव्हा वाटत होतं. 

ही सेलिब्रिटी म्हणजे (Lock Upp) ‘लॉक अप’ फेम साईशा शिंदे. साईशा समलैंगिक असल्यामुळंच तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा तिनं रिअॅलिटी शोमध्ये केला. 

काहींना जेव्हा आपण आपलं लैंगिक शोषण झाल्याचं सांगितलं तेव्हा तेव्हा तू गे आहेस असं म्हणत यामुळंच तुझ्यासोबत असं होत असल्याची प्रतिक्रिया दिली. ज्यानंतर आपल्यासोबत नेमकं काय घडलं हे सांगण्याचं धाडसच आपल्यात नव्हतं असं साईशानं स्पष्ट केलं. 

साईशा जेव्हा स्वप्नील होती… 
स्वप्नील असतेवेळी आपल्याला कायमच आपण गे पुरुष असल्याचं वाटत होतं असं साईशा यावेळी म्हणाली. ज्यावेळी स्वप्नीलनं साईशा होण्याचा निर्णय घेतला तेव्हाही त्याला प्रचंड मानसिक तणावाचा सामना करावा लागला होता. 

साईशा एक सेलिब्रिटी फॅशन डिझायनर आहे. दीपिका पदुकोणपासून, करिना, कतरिना आणि अनेक आघाडीच्या सेलिब्रिटींसोबत तिनं काम केलं आहे. 

Saisha Shinde narrates a painful story how Tarzar used to do ex boyfriend | Saisha  Shinde ने बयां की दर्द भरी दास्तान, बताया किस तरह टॉर्चर करता था  एक्स-बॉयफ्रेंड | Hindi News,

यशाच्या शिखरावर असतानाही, गतआयुष्यात घडलेल्या विदारक प्रसंगांनी मात्र तिची पाठ सोडलेलीच नाही हे मात्र नाकाराता येत नाही.  Source link

Leave a Reply