Headlines

Gautam Gambhir | धोनी-विराट नाही, गंभीर या खेळाडूला मानतो All Time Best कॅप्टन

[ad_1]

मुंबई :  महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) टीम इंडियाचा (Team India Captain) सर्वात यशस्वी कर्णधार राहिला. धोनीने टीम इंडियाला 2 वर्ल्ड कप जिंकून दिले. धोनीने कॅप्टन म्हणून केलेली कामगिरी कोणत्याही क्रिकेट चाहत्याला विसरता येणार नाही. धोनीनंतर विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात टीम इंडियाने अप्रतिम कामगिरी केली. पण भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर  (Gautam Gambhir)  या दोन्ही खेळाडूंना भारताचा सर्वोत्तम कर्णधार मानत नाही. गंभीरने काही महिन्यांपूर्वी त्याची बेस्ट प्लेइंग इलेव्हन टीम निवडली होती. गंभीरने या टीमच्या कॅप्टनपदी दुसऱ्याच खेळाडूची निवड केली होती. (team india former cricketer gautam gambhir pick all time best team anil kumble captain) 
 
गंभीरने या प्लेइंग इलेव्हनमध्ये टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंना संधी दिली. आश्चर्यकारक बाब म्हणजे गंभीरने या टीममध्ये धोनी, गांगुली आणि कोहली या तिघांपैकी एकाचीही सर्वोत्तम कर्णधार म्हणून निवड केली नाही. इतकंच नाही, गंभीरने रोहित शर्माच्या नावाचाही विचार केला नाही. 

गंभीरचा सर्वोत्तम कॅप्टन कोण?  

गंभीरने माजी कसोटी कर्णधार आणि दिग्गड गोलंदाज अनिल कुंबळेला आपला सर्वोत्तम कर्णधार ठरवलं होतं. कुंबळेला धोनी आणि कोहलीप्रमाणे दीर्घकाळ कॅप्टन्सी करण्याची संधी मिळाली असती, तर भारताला मोठी कामगिरी करता आली असती, असं गंभीरने तेव्हा म्हटलं होतं.  

कुंबळेमुळेच टीम इंडियाला कसोटीत पहिल्या स्थानी झेप घेता आली.  कुंबळेने आपल्या कॅप्टन्सीत टीम इंडियाला अव्वल स्थानी विराजमान केलं होतं. यामुळेच गंभीर कुंबळेला सर्वोत्तम कर्णधार मानतो.  

गंभीरने निवडलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सुनील गावसकर, वीरेंद्र सेहवाग यांनाही स्थान दिलं. तर तिसऱ्या स्थानी राहुल द्रविडची निवड केली होती.   

गंभीरची ऑल टाइम बेस्ट प्लेइंग इलेव्हन  :

सुनील गावस्कर, वीरेंद्र सहवाग, राहुल द्रविड़, सचिन तेंदुलकर, विराट कोहली, कपिल देव, महेंद्र सिंह धोनी (विकेटकीपर), हरभजन सिंह, अनिल कुंबले (कप्तान), झहीर खान आणि जवागल श्रीनाथ.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *