
असं म्हटलं जातं की यशस्वी प्रवासाची सुरुवात पहिल्या पावलाने होते. असंच काहीसं केलं आहे मीरा भाईंदर शहरात राहणाऱ्या गौरव सावंत भोसले Gaurav Sawant Bhosle) यांनी. गौरवने वेगवेगळ्या मार्शल आर्टस (Martial Arts) चॅम्पियनशिप्स मध्ये पार्टीसिपेट केले. तिथे उत्कृष्ट कामगिरी करत अनेक मेडल्स जिंकले, रेकॉर्ड आपल्या नावावर केले. गौरवच्या या कामगिरीची नोंद आता आणखी एका रेकॉर्ड बुक, म्हणजेचं इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड (India Book Of Records) मध्ये झाली आहे.
या रेकॉर्ड नंतर गौरवचे कुटुंब, मित्र, गौरवचे गुरू आणि शहरातील लोक खुश आहेत. गौरवच्या आई वडिलांनी त्याच्या यशाचं श्रेय त्याचे गुरू मास्टर विनोद कदम (Master Vinod Kadam) यांना दिले आहे.
गौरवचे कोच मास्टर विनोद कदम यांनी त्यांच्या शिष्याच्या यशाबद्दल बोलतांना सांगितले की, प्रत्येक गुरूला आपला शिष्य जितकी जास्त प्रगती करतो तितका आनंद होतो.
- “दीपक केसरकर अचानक कंठ फुटल्याप्रमाणे…” भास्कर जाधव यांचं बंडखोर आमदारांवर टीकास्र | Shivsena MLA Bhaskar Jadhav On deepak kesarkar and uday samant rmm 97
- Success Story: पहिली कमाई 200 रूपयांची, आता 200 crore चित्रपट, निर्मातीचा संघर्षमय प्रवास
- Maharashtra ATS will investigate Raigad suspect boat case ATS chief inspected boat spb 94
- राज्यात ‘प्रो-गोविंदा’ स्पर्धा; खेळाडूंना बक्षिसासह मिळणार शासकीय नोकरी, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा | Pro Govinda competition in maharashtra Sportspersons will get government job and prize cm eknath shinde announcement rmm 97
- nana patole criticized shinde fadnavis government on farner suicide in assembly session spb 94
21 वर्षीय गौरव ने कराटे, मार्शल आर्टस ट्रेनिंगला 10 वी ला असताना सुरुवात केली व गेल्या 7 वर्षांपासून तो याचा अभ्यास करत आहे. याच दरम्यान त्याने अनेक मार्शल आर्टस चॅम्पियनशिप्स मध्ये भाग घेतला आणि प्रत्येक मॅच सोबत तो चांगली कामगिरी करत मेडलवर आपले नाव कोरत गेला. या चॅम्पियन्सशिप्सच्या काही मॅचेसमध्ये त्याला विजय मिळाला तर काहीमध्ये अपयश. परंतु गौरवने आपले प्रयत्न सुरू ठेवले आणि आतापर्यंत त्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय (National And International Championships) स्पर्धांमध्ये 65 मेडल्स जिंकले आहेत. यात 30 सुवर्ण, 20 रौप्य आणि 15 कांस्य पदकांचा समावेश आहे.
गौरवने त्याचा भविष्यातील प्लॅन बद्दल सांगितले आहे. त्यात इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड नंतर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Records) चा समावेश आहे तसेच वेगवेगळ्या चॅम्पियन्सशिप्स मध्ये भाग घेणे ज्याने अनुभव वाढेल आणि मोठे लक्ष्य गाठण्यात फायदा होईल असेही म्हटले आहे.
लेखन – दिनेश शिंदे ,मीरा भाईंदर