Headlines

गौराई समोर साकारला गाव-गाड्याचा देखावा

सोलापूर / प्रभाकर गायकवाड – महाराष्ट्रमध्ये मोठा उत्साहात गौरी गणपतीचा सण साजरा केला जातो. मागील दोन वर्षात कोविडमुळे हा सण काही बंधनात साजरा करावा लागला होता. मात्र दोन वर्षानंतर पहिल्यांदाच सण बंधन मुक्त साजरा होत आहे. गणपती आणि गौराई समोर विविध देखावे सादर करत गणेश मंडळ आणि कुटुंब समाज प्रबोधन करीत असतात.

त्याचाच एक भाग म्हणून रानमसले गावातील पेशाने किराणा दुकानदार असलेल्या जगन्नाथ दत्तात्रय ठेले यांनी सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा देखावा सादर केला आहे .

देखाव्याचे वैशिष्ट्ये – ह्या देखाव्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे आपलं पूर्वीचा गावगाडा हा रेखाटलेला आहे.

देखाव्यात हया गोष्टी पाहायला मिळतात.

  • गावामध्ये असणाऱ्या पाण्याची भीषण समस्या
  • गावातील मराठी शाळा
  • गावातील लोकांची घरे
  • शेतकऱ्यांचा शेतामधील कामाचा देखावा
  • गाव गाड्यांमध्ये सामील असणारा आठवडी बाजार
  • गावातील विविध अशा वेगवेगळ्या समस्यांना वेगवेगळ्या ठिकाणांना ह्या देखावा मध्ये घेऊन देखावा अतिशय सुंदर व अप्रतिम स्वरूपाचा सादर केलेला आहे . एवढेच नव्हे तर शेतातील आलेली पिके हे देखील प्रात्यक्षिक म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये देखाव्यात सादर केले आहेत .

शहरातल्या लोकांना येणारं गावची आठवण – हा देखावा पाहिल्यानंतर शहरातील लोकांना गावाकडची आठवण आल्याशिवाय राहणार नाही .अशा पद्धतीचा अप्रतिम आणि सुरेख असा देखावा तयार केला. ठेले कुटुंबियांनी मागिल काही दिवसापासून या परिश्रमाला खूप चांगल्या पद्धतीची यश आले. ठेले कुटुंबांनी एकत्रित येत हा देखावा सादर केलेला आहे. या देखाव्याचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *