गरोदरपणात आलियाला कोणाकडून होतोय त्रास? असह्य होत मनातील संताप अखेर सर्वांसमोर…


मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिनं नुकतंच तिच्या गरोदरपणाची बातमी चाहत्यांच्या आणि मित्रपरिवाराच्या भेटीला आणली. रणबीरसोबतचा एक फोटो आलियानं सर्वांच्या भेटीला आणला आणि त्या क्षणापासून या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात झाली. पाहता पाहता आलिया- रणबीरला आलेल्या शुभेच्छांची संख्या इतकी वाढली, की तिनं आणखी एक पोस्ट करत सर्व शुभेच्छांबद्दल आभाराची भावना व्यक्त केली. (Bollywood Actress alia Bhatt Pregnant gets angry on some of media houses)

आलिया गरोदर असल्याचं कळल्यानंतर लगेचच कताही चर्चांनीही जोर धरला. काही माध्यमांनी तर ती आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणातूनच जुलै महिन्याच्या मध्यावर परतणार असल्याची शक्यता वर्तवणारी वृत्त प्रसिद्ध केली. 

आपल्याविषयी ही अशी चुकीची माहिती पेरली जात असल्याचं पाहून आलियाला याचा प्रचंड त्रास झाला आणि अखेर सोशल मीडियाच्या माध्यमातून तिनं संताप व्यक्त केला. 

आलिया कामं अर्ध्यावर सोडून आता आराम करण्यावर भर देणार असल्याचं ज्यांनी म्हटलं त्यांना तिनं चांगलंच धारेवर धरलं. रणबीर आपल्याला आणण्यासाठी परदेशात येणार असल्याचं म्हणणाऱ्यांनाही तिनं सुनावलं. (Ranbir kapoor alia bhatt )

इन्स्टा स्टोरीमध्ये लिहित आलिया म्हणाली, ‘आम्ही आताही लोकांच्या विचारांमध्ये आहोत. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते आपण अद्यापही जुनाट विचारांच्याच दिवसांमध्ये वावरतोय. काहीही उशीर झाला नाहीये. मला कुणीही आणण्यासाठी येण्याची गरज नाही. 

मी एक महिला आहे, कोणतीही पार्सलची वस्तू नाही. मला आरामाचीही अजिबातच गरज नाही’, असं म्हणत फुकाचे डॉक्टरी सल्ले देणाऱ्यांचा तिनं समाचार घेतला. 

आलियाचं हे संतप्त रुप पाहता, मर्यादेपलीकडे कोणीही आपल्याबद्दल बोलत असल्यास आता तीसुद्धा ऐकून घेणार नसल्याचंच स्पष्ट होत आहे. Source link

Leave a Reply