गर्दीने खच्च भरलेल्या लोकलमधून बॉलिवूड स्टारचा प्रवास; कोणीच ओळखलंही नाही


मुंबई : बॉलिवूडमधील सर्वोत्तम कलाकारांच्या यादीत काही कलाकारांची नावं गेल्या काही वर्षांमध्ये सातत्यानं येत आहेत. याच नावांच्या यादीत येणाऱ्या आणि वेळोवेळी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना थक्क करणाऱ्या अभिनेत्यानं सध्या कमालच केली. 

मुंबईतील वाहतुक कोंडीला कंटाळून म्हणा किंवा आणखी कोणत्या कारणामुळे म्हणा या अतिशय लोकप्रिय आणि तितक्याच धनवान अभिनेत्यानं चक्क मुंबई लोकलची वाट धरली. 

तो फलाटावर आला, तो गर्दीनं खच्च भरलेल्या लोकमध्ये फर्स्ट क्लास डब्ब्यात चढला, बसला, त्यानं प्रवास पूर्णही केला पण अखेरपर्यंत कोणालाच कळलं नाही की, हा बॉलिवूड अभिनेता आहे. 

ज्याचा अभिनय पाहून आपण त्याच्या कलेची दाद देतो असा हा अभिनेता आता मात्र आपल्यातच प्रवास करत होता हे मात्र कोणालाच कळलंही नाही.

थोडक्यात काय, तर मुंबईतील या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला शेजारी असणाऱ्या व्यक्तीकडेही पाहण्याची वेळ नसते असं म्हणतात ते खरंच हेच या प्रसंगातून कळलं. 

आता राहिला मुद्दा हा अभिनेता कोण, तर हा लोकप्रिय चेहरा होता अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी याचा. 

प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा नवाज कायमच चौकटीबाहेरच्या भूमिका आपल्याशा करतो. इथंही त्यांनं इतर सेलिब्रिटींगून वेगळीच वाट निवडली. 

अतिशय सहजपणे तो आला, त्यानं पाहिलं आणि त्यानं मुंबई लोकलनं प्रवासही केला… (nawazuddin siddiqui )

तोंडावर मास्क, डोळ्यांवर काळ्या रंगाचा गॉगल, मरुन रंगाचा टी शर्ट असा त्याचा सरळसाधा लूक. आहे की नाही गंमत? त्याच्या शेजारी असणारे, आजुबाजूने जाणारे तुम्ही तर नव्हता ना? Source link

Leave a Reply