‘गंगूबाई काठियावाडी’ वादाच्या भोवऱ्यात, नवं प्रकरण आलं समोर


मुंबई : फिल्म निर्माता आणि निर्देशक संजय लीला भंसाली यांचा सिनेमा ‘गंगूबाई काठियावाड़ी’ वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या सिनेमाचे वाद काही संपायचं नाव घेत नाही. 

निर्माता निर्देशक संजय लीला भन्साली आणि संबंधित काही जणां विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.  (Gangubai Kathiawadi Congress MLA Demand change Movie name Mumbai High Court ) काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी आज जनहित याचिका दाखल केली. 

‘गंगुबाई काठियावाडी’ सिनेमाचं नाव बदलण्याची मागणी केली जात आहे. ‘काठियावाड’ नाव असल्याने सदर शहराची प्रतिमा मलिन होणार असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. 

अमीन पटेल यांनी हे ही आरोप केला आहेत की,  कामाठीपुरा हा मोठा परिसर आहे त्यात फक्त एक दोन गल्ली मध्ये रेड लाईट एरिया आहे. म्हणून संपूर्ण कामाठीपुराचा नाव खराब होणं हे योग्य नाही.

२५ फेब्रुवारी रोजी ‘गंगुबाई काठियावाड’ हा सिनेमा रिलीज होणारआहे. या सिनेमाच्या संदर्भात मुंबई हायकोर्टात उद्या सुनावणी होणं अपेक्षित आहे. 

गंगूबाई काठियावाडी चित्रपटात आलिया भट्ट आणि अजय देवगण  एकत्र काम करणार असल्याने आधीच या सिनेमाची खूप चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी ‘सैया’ हे चित्रपटाचतील गाणे रिलीज झाले.

तेव्हा या गाण्यात शंतनू माहेश्वरीला पाहून चाहते आणखीनंच एक्साईटेड झाले. या गाण्यात त्याची आलियासोबतची केमिस्ट्री जबरदस्त वाटत आहे.

गंगूबाईंच्या आयुष्यातील आणखी एक पैलू सांगणारं गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या दोघांचं ‘मेरी जान’ हे चित्रपटातील दुसरे गाणे रिलीज झाले आहे.

गाण्यात गंगूबाई म्हणजेच आलिया तिचा प्रियकर अफसान म्हणजेच शंतनू माहेश्वरीसोबत कारच्या मागच्या सीटवर रोमान्स करताना दिसत आहे. त्यांचा हा इंटीमेट सीन खूपच व्हायरल होत आहे. 

आलिया, तिच्या ओठांवर गुलाब दाबून, शंतनूला किस केण्यास प्रवृत्त करते. नंतर, जेव्हा शंतनू जबरदस्तीने किस करतो.

तेव्हा आलिया त्याला कानाशिलात लगावते, पण नंतर त्याला शांत करते. असं या गाण्यात दाखवण्यात आलं आहे. या रोमँटिक गाण्यात, दोघांचा किससाठीची धडपड दाखवणारा हा सीन सध्या खूपच चर्चेत आहे. Source link

Leave a Reply