Headlines

Gangubai Kathiawadi देहव्यापार करत नव्हत्या, त्या तर…; कोणाच्या वक्तव्यामुळे माजली एकच खळबळ

[ad_1]

मुंबई : बॉलिवूडमध्ये मागील काही दिवसांपासून अभिनेत्री आलिया भट्ट (Alia bhatt) हिची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या ‘गंगूबाई काठियावाड़ी’ (Gangubai Kathiawadi)चीच चर्चा सुरु आहे. आलियाच्या या आगामी चित्रपटानं उत्सुकता इतकी शिगेला पोहोचवली आहे, की आता कधी एकदा चित्रपट प्रदर्शित होतो, याचीच प्रतीक्षा लागली आहे. 

पण, उत्सुकतेच्या या वातावरणात आता मीठाचा खडा पडताना दिसत आहे. ज्या गंगुबाई यांच्या जीवनावर चित्रपटाची कथा आधारित आहे, त्याच गंगुबाई यांच्या कुटुंबानं आता नाराजीचा सूर आळवला आहे. 

कोणी व्यक्त केली हरकत? 
गंगुबाई यांनी दत्तक घेतलेला मुलगा, बाबू रावजी शाह यांनी चित्रपटाविरोधात 2021 मध्ये एक याचिकाही दाखल केली होती. पण, न्यायालयानं मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळा आणण्यास नकार दिला होता. 

आता पुन्हा एकदा, या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर गंगुबाई यांच्या कुटुंबीयांनी निर्माते- दिग्दर्शकांविरोधात कायदेशी कारवाई करण्याची पावलं उचलली आहेत. 

माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार चित्रपटाचा ट्रेलर पाहून गंगुबाई यांचे कुटुंबीय हैराण आहेत. ज्या महिलेनं समाजकार्य केलं, त्यांना चित्रपटात एक देहव्यापार करणारी महिला म्हणून दाखवलं गेलं आहे. 

कुटुंबीय हे सहन कसं करणार? असा सूर आळवत तुम्ही त्यांना नकारात्मक भूमिकेत दाखवत लेडी डॉन म्हणून पडद्यावर आणलं आहे हा नाराजीचा सूर कुटुंबीयांनी आळवला. 

चित्रपटामुळे गंगुबाई यांच्या कुटुंबीयांना समाजात स्वच्छंदीपणे वावरता येत नसल्याची बाब त्यांच्या कुटुंबीयांनी माध्यमांसमोर ठेवली. त्यांना आपलं राहतं घरही बदलावं लागल्याची माहिती त्यांनी दिली.

गंगुबाई खरंच देहव्यापार करत होत्या का, असाच प्रश्न आपल्याला अनेकजण विचारत असल्याचं कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे.

सदर प्रकरणी संजय लीला भन्साळी आणि ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ पुस्तकाचे लेखक हुसैन जैदी यांनाही गंगुबाई यांच्या कुटुंबाने नोटीस बजावली आहे. पण, त्याचं उत्तर मात्र अजुनही प्रतिक्षेत आहे. 

चित्रपट निर्माते पैशांसाठी आपल्या कुटुंबाची समाजात नाचक्की करत असल्याचा आरोप गंगुबाई यांच्या नातीने केला. चित्रपट साकारतेवेळी कोणत्याही लेखकाने आपल्या कुटुंबाची परवानगी घेतली नसल्याचं त्यांची नात भारती म्हणाली आहे. 

तेव्हा आता गंगुबाई यांचे कुटुंबीय आणि चित्रपट निर्मात्यांमधला वाद नेमका कोणत्या पद्धतीनं निकाली निघणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *