Headlines

गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी मोदी एक्स्प्रेस, जाणून घ्या ट्रेन सुटण्याची वेळ आणि ठिकाण | BJP Nitesh Rane Ganeshotsav 2022 Modi Express From Dadar to Kankavli sgy 87



गणेशोत्सव जवळ आल्याने मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांना गावाकडचे वेध लागले आहेत. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. यामुळेच एक्स्प्रेसचं तिकीट मिळणं अनेकांसाठी अवघड होऊन जातं. एक्स्प्रेसचं तिकीट मिळत नसल्याने अनेकजण अतिरिक्त पैसे मोजून बसने जाणं पसंत करतात. दरम्यान, गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी यावर्षीही मोदी एक्स्प्रेस घावणा आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी ही माहिती दिली आहे.

नितेश राणे यांनी ट्विटरला एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “यंदाही गणपतीला गावी जाण्यासाठी मोदी एक्स्प्रेस आणण्यात येणार आहे. गेल्या १० वर्षापासून बसेस सोडत असून, मागील वर्षापासून मोदी एक्स्प्रेस सगळ्यांसाठी सोडण्यात आली. यावेळी २९ ऑगस्टला सकाळी १० वाजता दादर रेल्वे स्थानकावरून प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरुन तुमची हक्काची मोदी एक्स्प्रेस सुटणार आहे”.

प्रतीक्षायादीचे तिकीटही उपलब्ध नाही, गणेशोत्सवात कोकणातून परतीचा रेल्वे प्रवासही ‘हाऊसफुल्ल’

“ही एक्स्प्रेस दादरपासून कणकवलीपर्यंत जाणार असून, वैभववाडीमध्ये थांबणार आहे. मोदी एक्स्प्रेसमध्ये एक वेळेचं जेवण दिलं जाणार आहे. आरतीचं पुस्तकही देणार आहोत. सगळी तयारी झालेली आहे,” अशी माहिती नितेश राणे यांनी दिली आहे.

तिकीटासाठी भाजपाच्या मंडळ किंवा तालुका अध्यक्षांना फोन करायचा आहे असं नितेश राणेंनी सांगितलं आहे. कणकवली, देवगड आणि वैभववाडी येथील मंडळ आणि तालुका अध्यक्षांना फोन करा असं आवाहन नितेश राणे यांनी केलं आहे.



Source link

Leave a Reply