Headlines

Ganeshotsav: गणपतीचं पुढच्या वर्षी 19 दिवस उशिराने आगमन, नेमकं कारण जाणून घ्या

[ad_1]

Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीला आगमन झालेल्या लाडक्या गणरायाला साश्रू नयनाने निरोप दिला जात आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ जयघोषाने बाप्पाचं विसर्जन केलं जात आहे. दीड, पाच आणि गौरी गणपतीचं विसर्जन झालं आहे. असं असताना पुढच्या वर्षी गणपती बाप्पा कधी येणार? याबाबत चर्चा रंगली आहे. 2023 या वर्षात गणपती बाप्पा 19 दिवस उशिराने येणार आहेत. या वर्षी गणपती बाप्पाचं 31 ऑगस्ट 2022 रोजी आगमन झालं होतं. पुढच्या वर्षी म्हणजे 2023 या वर्षी गणपती बाप्पा 19 सप्टेंबरला विराजमान होणार आहेत. तर अनंत चतुर्थी 28 सप्टेंबर 2023 रोजी असणार आहे. 

2023 या वर्षात अधिक आषाढ मास असल्याने गणेशोत्सव 19 दिवस उशिराने असणार आहे. 17 जुलैपासून 16 ऑगस्टपर्यंत अधिक आषाढ मास असणार आहे. त्यामुळे श्रावण महिना आणि भाद्रपद महिन्यातील उत्सव पुढे जाणार आहे. सौर कॅलेंडरनुसार श्रावण महिना 17 ऑगस्टपासून सुरु होईल आणि 14 सप्टेंबर 2023 रोजी संपेल. त्यानंतर भाद्रपद चतुर्थीला म्हणजेच 19 सप्टेंबरला गणेश चतुर्थी असणार आहे. 

हिंदू कॅलेंडरनुसार प्रत्येक तीन वर्षानंतर अधिक मास असतो. अधिक मासालाला मल मास किंवा पुरुषोत्तम मास म्हटलं जातं. हिंदू धर्मात अधिक मासाला विशेष महत्त्व आहे. या काळात पूजाविधी, व्रत, उपवास, जप यासारखे धार्मिक कार्य केली जातात. हिंदू धर्मानुसार अधिक मासात केलेली पूजा विधी, जप यांना 10 पट जास्त फळ मिळतं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *