Headlines

gajanan kirtikar joined eknath shinde son amol with uddhav thackeray

[ad_1]

शुक्रवारी संध्याकाळी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गट सोडून शिंदेंसोबत जाणाऱ्या खासदारांची संख्या आता १३ वर गेली आहे. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात असताना दुसरीकडे शिंदे गटाकडून मात्र ताकद वाढल्याची प्रतिक्रिया दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे गजानन किर्तीकरांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत शिंदे गटाची वाट धरली असताना त्यांचे पुत्र मात्र अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत. त्यामुळे राजकीय समीकरणांमुळे या दोन्ही पिता-पुत्रांमध्ये मतभेद असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. गजानन किर्तीकर यांचे पुत्र अमोल किर्तीकर उद्धव ठाकरेंसोबत राहण्यावर ठाम असल्याचं सांगितलं जात आहे.

शिंदे गटात जाताच उद्धव ठाकरेंवर टीकास्र!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना किर्तीकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं. “आम्ही सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसची सोबत सोडा. सगळ्या खासदारांनी हे सांगितलं होतं. पण त्यानंतरही धोरणात काही बदल होत नाही म्हणून ते १२ खासदार गेले. मी यासाठीच थांबलो होतो की काही बदल होतो का? ते पाहावं. आपण उडी मारायची आणि आपण सांगायचं समेट करा, राष्ट्रवादी सोडा असं नको म्हणून थांबलो. पण या धोरणात काही बदल झाला नाही”, असं किर्तीकर म्हणाले.

दरम्यान, वडिलांनी शिंदे गटात प्रवेश केला असला, तरी अमोल किर्तीकर मात्र उद्धव ठाकरेंसोबत राहण्यावर ठाम आहेत. नुकतीच अमोल किर्तीकर यांची शिवसेना उपनेतेपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर वडिलांनी वेगळा निर्णय घेतलेला असतानाही अमोल किर्तीकर मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे या पिता-पुत्रांमध्ये राजकीय वाट चोखाळण्यावरून मतभेद असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. यासंदर्भात गजानन किर्तीकर यांना विचारणा केली असता त्यांनी यावर आपली स्पष्ट भूमिका मांडली.

“मी एवढ्यासाठीच थांबलो होतो की…”, शिंदे गटात जाताच गजानन किर्तीकरांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र!

काय म्हणाले किर्तीकर?

आपण मुलावर कोणतंही बंधन घातलं नसल्याचं यावेळी गजानन किर्तीकर म्हणाले. “मुलाला मी काही बंधन घातलेलं नाही. त्याला मी काही करायला सांगितलेलं नाही. तो शिवसेनेत काम करायला लागला ते स्वत:च्या मर्जीनं. त्याच्यात आणि माझ्यात कुठला वादही नाही. मी त्याला म्हटलं मला जायचंय. हे काही मला सहन होत नाहीये. ही शिवसेना वेगळ्या पद्धतीने चाललीये. शिवसेनेत हा बदल झाला. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीची सोबत घेतली. हिंदुत्ववाद सोडला. जर त्यांनी भाजपाची सोबत पुन्हा केली तर मला त्या शिवसेनेसोबत राहायचंय. नसेल, तर मला जायचंय”, असं गजानन किर्तीकर म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *