गडगंज संपत्ती तरीही पैशांवरुन वाद? Sunny Deol वर फसवणूकीचा आरोप


मुंबई : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सनी देओलनं आता पर्यंत अनेक हिट चित्रपट देत लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मात्र, चित्रपटाचे निर्माते सुनील दर्शन (Suneel Darshan) यांनी एका मुलाखती दरम्यान, सनी देओलवर गंभीर आरोप केले आहेत. सनी देओलनं त्यांच्यासोबत फसवणूक केल्याचे म्हटले जाते. 

सुनील यांनी सनी देओलवर हे आरोप केले आहेत. 

निर्माता सुनील दर्शन यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सनी देओलनं त्याची फसवणूक केल्याचा आरोप केला आणि त्याला खूप जास्त Attitude आहे. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत सुनील म्हणाले, ‘सनी देओल खूप अहंकारी आहे. 26 वर्षांनंतरही माझे त्याच्यासोबत मतभेद आहेत. सगळ्यात आधी त्यानं माझे पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते. पण नंतर तो म्हणाला की त्याच्याकडे पैसे नाहीत म्हणून मी त्याच्यासोबत चित्रपट करायला हवा.

हेही वाचा : Sushant Singh Rajput ची मॅनेजर दिशा सालियनचा मृत्यूचं कारण अखेर समोर

सुनील पुढे म्हणाले, ‘हे प्रकरण भारताचे निवृत्त सरन्यायाधीश यांच्या समोर ठेवण्यात आले होते. माझे पैसे परत करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाहीत, त्यामुळे तो माझ्यासाठी चित्रपट करेल, असे सनीने त्यावेळी सांगितले. मी त्याचा भाऊ बॉबी देओलसोबतही काम करत होतो. मी बॉबीसोबत बॅक-टू-बॅक तीन चित्रपट केले. मला त्याच्यासोबत काही अडचण नव्हती. मला वाटलं की चूक केल्यानंतर ती व्यक्ती ती चूक सुधारू शकते. पण त्यानं मला फसवलं. सनीने माझी फसवणूक केली. (Sunny Deol cheated Suneel Darshan)

सुनील पुढे सनीवर आरोप करत म्हणाले, सनी पहिले चित्रपट करणार असं म्हणाला, पण नंतर तो चित्रपटाच्या डेट्स पोस्टपोन करू लागला आणि अशा प्रकारे कॉन्ट्रॅक्टमध्ये नमूद केलेली वेळ ही निघून गेली. जेव्हा त्यांच्या वकिलांनी सनीला नोटीस पाठवली तेव्हा त्याची लीगल टीम म्हणाली की सनीनं अजून डायलॉग्स अप्रुव्ह केले नाही. याबाबत बोलताना सुनील म्हणाले, ‘मला त्याच्याकडून डायलॉग्स मंजूर करून घेण्याची गरज नव्हती. कोणत्याही अभिनेत्यानं डायलॉग्सवर होकार दिला का? त्याचा हेतू चुकीचा होता. चित्रपटासाठी बराच पैस आणि वेळ गुंतवला होता. (filmmaker suneel darshan claims sunny deol fooled him did not return his money) 

निर्माता सुनील दर्शन आणि सनी देओल यांच्यातील हा वाद 1996 सालापासून आतापर्यंत सुरु आहे. 1996 मध्ये जेव्हा सुनील दर्शन दिग्दर्शित सनी देओलचा ‘अजय’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तेव्हा सुनील यांनी आरोप केला  की सनीने चित्रपट अपूर्ण सोडला होता आणि क्लायमॅक्सचे चित्रीकरण करण्यास नकार दिला होता. तो चित्रपट न संपवता प्रदर्शित केल्याचा दावा सुनील दर्शन यांनी केला. चित्रपट चांगला चालला, पण दोघांमध्ये कायदेशीर लढाई सुरू झाली.Source link

Leave a Reply