Headlines

Gmail वर येणाऱ्या फ्रॉड ईमेल्सने डोकेदुखी वाढविली? असे करा ब्लॉक, मिनिटांत होईल काम

[ad_1]

नवी दिल्ली:Gmail Users: प्रत्येकजण Google आणि Gmail शी परिचित असेलच. जर तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन युजर असाल तर फोन सक्रिय करण्यासाठी तुम्हाला जीमेलमध्ये लॉगिन करावे लागते . यासोबतच यूट्यूब, Google Map आणि गुगल मीट सारख्या इतर Google Services साठीही जीमेल खाते आवश्यक आहे. प्रत्येकाशी संबंधित असे मेल्स जीमेलवर येतात. यापैकी बरेच फसवणूक आणि निरुपयोगी ईमेल असतात. अशात तुमचे महत्त्वाचे मेल चुकतात. ज्यामुळे तुमचे Gmail स्टोरेज तर भरतेच. पण, यामुळे डोकेदुखीही वाढते. जर तुम्हाला दररोज अशा ईमेल्सचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही काही मिनिटांत असे ईमेल ब्लॉक करू शकता. संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया.

वाचा: रिचार्ज करा आणि ३ महिन्यांपर्यंत टेन्शन फ्री राहा ! Jio च्या स्वस्त प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह बरच काही

Gmail मध्ये जंक ईमेल कसे ब्लॉक करावे?

प्रथम Gmail उघडा. त्यानंतर तुम्हाला ब्लॉक करायचा असलेला ईमेल मेसेज उघडा. यानंतर, वरच्या उजव्या कोपर्यात तीन डॉट्स दिसतील, ज्यावर क्लिक करा. मग अनेक पर्याय दिसतील. यापैकी तुम्हाला ब्लॉक या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला कन्फर्म करावे लागेल. अशा प्रकारे तुम्ही कोणताही ईमेल ब्लॉक करू शकाल.

वाचा: जबरदस्त ! iPhone 14, iPhone 13, iPhone 12 स्वस्तात खरेदीची संधी, Flipkart वर ब्लॅक फ्रायडे सेल सुरू

Gmail चे ब्लॉक ईमेल कसे अनब्लॉक करावे

यानंतर, तुम्हाला मॅनेज युअर गुगल अकाउंट या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर, तुम्हाला वरच्या बाजूला दिसणार्‍या People & sharing वर क्लिक करा. या खाली संपर्क आणि टॅप ब्लॉक पर्याय दिसेल. यानंतर, तुम्हाला ब्लॉक केलेल्या Google उत्पादन खात्यांची सूची दिसेल. त्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीला अनब्लॉक करायचे आहे त्याच्या नावावर टॅप करा. त्यानंतर सिलेक्ट ऑप्शनवर क्लिक करा.

वाचा: प्रत्येक युजरच्या विशलिस्टमध्ये असणाऱ्या Samsung च्या Foldable फोनवर तब्बल ५० हजारांचा डिस्काउंट

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *